आशियातील सर्वोत्तम संघ कोण, याचा फैसला करणारी आशिया चषक स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत ८ संघांचा समावेश असणार आहे आणि त्यामुळे चुरस अधिक वाढणार हे निश्चित आहे.
अफगाणिस्तानच्या संघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण त्यांनी मागील काही वर्षांत घेतलेली भरारी ही सर्वांना अचंबित करणारी ठऱली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला चर्चेचा विषय आहेच. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी आपापली टीम जाहीर केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) च्या यजमानपदाखाली ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक महत्त्वाची आहे. या स्पर्धेत आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे आणि त्यानंतर सुपर फोअर व अंतिम सामना होईल.
अ गटात भारत, ओमान, पाकिस्तान व यजमान संयुक्त अरब अमिराती आहे, तर ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग व श्रीलंका हे संघ आहेत.
Asia Cup 2025 squads:
अफगाणिस्तान : राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, दरविश रसूली, सेदीकुल्ला अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फरीद मलिक, नवीन-उल-हक्क
बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), तंजीद हसन, परवेझ हुसैन इमॉन, सैफ हसन, तौहीद ह्रदोय, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकीफ, शॉकीफ अहमद, शाकिब शेख, शमीम अहमद, उरीद हसन.
हाँगकाँग : यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हान मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक उल रहमान इक्बाल, किंचित शाह, आदिल मेहमूद, हारून मोहम्मद अर्शद, अली हसन, शाहिद वासीफ, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
ओमान: जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान मेहमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, श्रीवास्तव अहमद, श्रीवास्तव.
पाकिस्तान: सलमान अली आगा (कर्णधार), अब्रार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सइम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.
श्रीलंका: चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महेश थेकशाना, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, दुनीथ वेललागे, चमिका करुणारत्ने, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, दुशियाना, दुशियाना माथेशा पाथीराणा.
यूएई : मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दिकी, मतिउल्ला खान, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा, रोहिद खान, सिमरनजीत सिंह, साह्य खान.
सामन्याची वेळ बदलली…
संयुक्त अरब अमिराती येथील उष्ण हवामानाच्या कारणामुळे सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. स्पर्धेतील लढती सायंकाळी ७.३० वाजता खेळवण्यात येणार होत्या, परंतु आता त्या भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांच्या लढती Sony Sports Network आणि Sonyliv app वर पाहायला मिळणार आहेत.