Thursday, September 11, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पुन्हा पावसाचा तडाखा! 9 जिल्ह्यांना अलर्ट, नागरिकांनी घ्यावी काळजी

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा तडाखा! 9 जिल्ह्यांना अलर्ट, नागरिकांनी घ्यावी काळजी

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 7 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

 

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार कमबॅक होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

 

कुठे कोणता अलर्ट?

 

पालघर जिल्हा: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस – ऑरेंज अलर्ट

 

मुंबई, ठाणे, रायगड: मुसळधार पावसाची शक्यता – यलो अलर्ट

 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग: मध्यम पावसाचा अंदाज

 

पुणे घाटमाथा: मुसळधार पाऊस – यलो अलर्ट

 

कोल्हापूर, सातारा घाटमाथा: मध्यम पाऊस

 

मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस

 

छत्रपती संभाजीनगर, जालना: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा – यलो अलर्ट

 

परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव: हलका ते मध्यम पाऊस

 

नाशिक घाटमाथा: अति मुसळधार पावसाची शक्यता – ऑरेंज अलर्ट

 

धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर: मध्यम पावसाचा अंदाज – नंदुरबारला यलो अलर्ट

 

विदर्भात ढगाळ हवामान व हलकासा पाऊस

 

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया: अंशतः ढगाळ वातावरणासह हलका पाऊस

 

चंद्रपूर, गडचिरोली: विजांच्या कडकडाटासह पाऊस – यलो अलर्ट

 

हवामान विभागाचा इशारा

 

राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाटमाथ्यांवर प्रवास करणाऱ्यांनी विशेषतः काळजी घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -