गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवीयन विद्यार्थ्याशी गैरवर्तन केलं. आरोपीचं नाव शैलेश खुंट असे नाव आहे.
त्याने गृहपाठ देणार नाही असे लहान मुलाला आमिष दाखवून तिच्यासोबत वाईट कृत्य केलं. संबंधित प्रकरणात आरोपीने पोलिसांना अटक केली आहे.
पीडित मुलाने शाळेत जाण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. पीडिताने आपल्या आई वडिलांसमोर अश्रू ढाळले. पीडिताच्या आईने संबंधित प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, बाबरा तालुक्यातील एका शाळेत शिक्षण घेत होता. त्यांच्या गावापासून 35 लहान मुलं शाळेत जातात. मुलगा शाळेत जाण्यापूर्वी दोन दिवसांपासून रडत होता.
बाथरूममध्ये नेलं आणि गुप्तांगाला लावला हात
पालकांनी अनेकदा त्याच्याकडे विचारपूस केली असता, तिनं घाबरून मुख्याध्यापकांबद्दलचे संपूर्ण सत्य उघड केले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, मुख्याध्यापक शैलेश खुंट गेल्या एका वर्षापासून त्याच्यासोबत अश्लील कृत्य करत होते. पोलिसांनी दिलेल्या जबाबात सांगितलं की, आरोपी विद्यार्थिनीला एकटे बोलवायचा. त्यानंतर शाळेच्या मागे असलेल्या कम्प्युटर लॅबमध्ये, कधी छतावर तर कधी जुन्या बाथरूममध्ये घेऊन जायचा आणि तिच्या शरीरावर विनयभंग करायचा. एवढंच नाही,तर त्याने विद्यार्थ्याच्या गुप्तांगालाही हात लावला होता आणि अनेकदा चुंबनही घेतलं होतं.
तु कोणाला काहीही सांगू नकोस मी तुला…’
मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला घरी काहीही सांगू नको, मी तुला गृहपाठही देणार नाही. मी तुला शाळेतही काहीही बोलणार नाही, असं आमिष दाखवले. यामुळेच विद्यार्थी मुलानं काहीही सांगितलं नाही, पण त्यानंतर त्याने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार हा आईला सांगितला आणि आईने बाबरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुख्याध्यापकाविरोधात भारतीय न्यायसंहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोक्सो कायद्याच्या 8 आणि 10 कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.