इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) पदासाठी ४५५ जागांवर १०वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू आहे.
उमेदवारांकडे LMV लायसन्स आणि किमान १ वर्षाचा वाहनचालक अनुभव असणे आवश्यक आहे.
या नोकरीसाठी पगार २१,७०० ते ६९,१०० पर्यंत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ सप्टेंबर २०२५ आहे.
Intelligence Bureau Recruitment 2025: तुमचीही दहावी पास आहात आणि सरकारी नोकरी शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने सुरक्षा सहायक (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे
इच्छुक उमेदवारांनी 28 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकृत वेबसाईट mha.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
एकूण पदे
455 पदांसाठी भरती होणार असून ही भरती देशभरातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सहाय्यक गुप्तचर विभागांमध्ये (SIB) केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
LMV (लाइट मोटर व्हेईकल) ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे.
लायसन्स मिळाल्यानंतर किमान 1 वर्षाचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 27 वर्षे
SC/ST/OBC उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क: 100
प्रोसेसिंग शुल्क: 550
एकूण शुल्क: 650
भरणा पद्धती: डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI किंवा चलनाद्वारे करता येईल.
भरती प्रक्रिया
उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल:
टियर-1 परीक्षा – सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी
टियर-2 परीक्षा – व्यावहारिक/चालक चाचणी
मूल कागदपत्रांची तपासणी (Document Verification)
वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
पगार व भत्ते
पे स्केल: 21,700 ते 69,100 (लेव्हल-3)
इतर लाभ:
महागाई भत्ता (DA)
घरभाडे भत्ता (HRA)
प्रवास भत्ता (TA)
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अंतर्गत पेन्शन
वैद्यकीय सुविधा
अवकाश/रजा सवलती
FAQs
1. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कोण पात्र आहे? (Who is eligible to apply for the IB recruitment?)
१०वी उत्तीर्ण उमेदवार, ज्यांच्याकडे वैध LMV लायसन्स आणि १ वर्षाचा वाहनचालक अनुभव आहे, ते अर्ज करू शकतात.
2. या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे? (What is the age limit for this recruitment?)
उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे; SC/ST/OBC प्रवर्गांना शासन नियमानुसार सूट आहे.
3. भरती प्रक्रिया कशी असणार आहे? (What is the selection process for IB recruitment?)
निवड चार टप्प्यांत होईल टियर-१ परीक्षा, टियर-२ ड्रायव्हिंग चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.
4. या नोकरीचा पगार किती आहे? (What is the salary for the post?)
वेतन २१,७०० ते ६९,१०० (लेव्हल-३) असून DA, HRA, TA, NPS पेन्शन आणि वैद्यकीय सुविधा मिळतील.