Tuesday, September 16, 2025
Homeब्रेकिंगमोठं संकट! आजचा दिवस धोक्याचा, घराबाहेर पडणे टाळाच, अत्यंत मोठा इशारा

मोठं संकट! आजचा दिवस धोक्याचा, घराबाहेर पडणे टाळाच, अत्यंत मोठा इशारा

मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. आज अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचे ढग राज्यावर आहेत. पंजाब, हरिणाया आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पावसाने हाहाकार माजवलाय. आज रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईला येलो अलर्ट. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, लातूर, अकोला, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज फार महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे.

 

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहताय. चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे.

.यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदी चंद्रपूर जिल्ह्यात पूर येण्याचं कारण ठरू शकते. वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका इरई नदीला देखील बसला असून यामुळे चंद्रपूर शहरातले रहमत नगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचे पाणी शिरलं आहे. यामुळे काल रात्री जवळपास 50 ते 60 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

 

बुधवारपर्यंत पावसाचा येल्लो अलर्ट नाशिकला देण्यात आलाय. रविवारी आणि सोमवारी शहरासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वाऱ्यासह वादळी पावसाची दाट शक्यता. पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी लावल्याचे बघायला मिळतंय. शनिवार ते बुधवारपर्यंत हवामान विभागाकडून नाशिकला येल्लो अलर्ट देण्यात आला. शनिवारी अल्प प्रमाणात हजेरी लावलेल्या पावसाची 2. 6 मिलिमीटर नोंद झाली. मुंबईमध्येही रात्रभर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -