Tuesday, September 16, 2025
Homeब्रेकिंगसावधान! पुढील 3 तास राज्यावर संकट, थेट रेड अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना मोठे...

सावधान! पुढील 3 तास राज्यावर संकट, थेट रेड अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना मोठे आवाहन

राज्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळताना दिसतोय. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू असून याचा परिणाम लोकल सेवेवर झालाय. मध्य रेल्वेची वाहूत 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. राज्यातील अनेक धरणे ओव्हर फ्लो झाली असून पूरस्थिती निर्माण झाली.

 

मुंबईमध्ये सकाळी पावसाचा जोर वाढला असून अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज दिला असून पुढील तीन तास अत्यंत धोक्याची आहेत. मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासात मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पुणे आणि रायगडलाही रेड अलर्ट देण्यात आला. काही भागात पाणी साचण्यास देखील सुरूवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

 

पुढील तीन तास अतिमुसळधार पावसासोबतच रेड अलर्ट जारी केल्याने नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. मुसळधार पावसाचा फटका लोककला बसला असून मध्य, वेस्टर्न आणि हार्बर लाईनवर रेल्वे सेवा विस्कळीत झालीये. लोकल गाड्या या उशिराने धावताना दिसत आहेत. मध्य रेल्वे लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. कल्याण सीएसएमटीकडे जाणारी फास्ट ट्रेन 15 मिनिटं तर कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन 10 ते 12 मिनिट उशिराने सुरू आहे.

 

वेस्टर्न रेल्वेवर विरार ते चर्चगेट लोकल 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे. हार्बर लाईनवर नेरूळ ते सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे. यासोबतच किंग सर्कलमध्ये पाणी साचत आहे. मुंबई उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम पश्चिम द्रुतगती महामार्गावरही दिसून येत आहे. जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. ही वाहतूक कोंडी गोरेगाव ते सांताक्रूझ पर्यंत आहे.

 

आज सोमवार आहे आणि आठवड्याचा कामाचा पहिला दिवस आहे आणि ही वेस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी लोकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय. बार्शी तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग झाली. बार्शी तालुक्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात निर्माण झाली पूरसदृश्य परिस्थिती.

 

पुढील 3 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरसह विदर्भ, कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. संभाव्य अलर्ट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -