कर्मचाऱ्यानं बॉसला Sick Leave साठी मेसेज केला.
अवघ्या १० मिनिटांत हृदयविकाराने मृत्यू झाला.
मृत कर्मचाऱ्याचं नाव शंकर, वय ४० वर्षे.
ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली.
आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.
याचं जिवंत उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमधून समोर आलं आहे. ४० वर्षीय कर्मचाऱ्यानं बॉसकडे पाठदुखीमुळे सुट्टीची विनंती केली, आणि अवघ्या १० मिनिटांत त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. बॉसनं त्यानंतर एक ह्रदयद्रावक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
आजारी असल्याकारणानं कर्मचाऱ्यानं त्याच्या बॉसला Sick Leaveसाठी विनंती केली. ४० वर्षाच्या कर्मचाऱ्याच्या पाठीत दुखत असल्यामुळे त्यानं त्याच्या सरांना मेसेज केला. मात्र, त्यानंतर अवघ्या १० मिनिटाच्या आत त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ही बातमी कळताच बॉसला धक्काच बसला.
यानंतर के.व्ही अय्यर यांनी एक्सवर एक ह्रदयद्रावक पोस्ट शेअर केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, ‘माझ्या सहकाऱ्यानं सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, मेसेज केला होता. पाठदुखीमुळे येऊ शकणार नाही, असं तो म्हणाला. म्हणून त्याला मी, ठीक आहे, आराम कर, असं मी त्याला मेसेज केला’.
सकाळी ११ वाजता मला एक फोन आला. मला धक्काच बसला. शंकर (कर्मचारी) याचे निधन झाले असल्याचं मला कळवण्यात आलं. सुरूवातीला मला विश्वास बसला नाही. म्हणून मी दुसऱ्या सहकाऱ्याशी संपर्क साधला. शंकरचा पत्ता जाणून घेतला. मी त्याच्या घरी गेलो. तेव्हा कळालं की शंकर आता या जगात नाही’,असं अय्यर म्हणाले.
तो सहा वर्षे माझ्या टीमचा भाग होता. फक्त ४० वर्षांचा होता. तंदुरस्त आणि निरोगी होता. विवाहीत आणि त्याला एक मुलगा होता. त्याला कशाचंही व्यसन नव्हतं’, असंही अय्यर म्हणाले. दरम्यान, शंकरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, के.व्ही अय्यर यांच्या पोस्टवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.