दसऱ्याला अजून अडीच आठवड्यांचा वेळ आहे. असं असतानाच दसऱ्याच्या सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सुट्ट्या 17 दिवस असणार आहेत. राज्य सरकारनेच या सुट्ट्यांची घोषणा केली असून सदर सुट्ट्या राज्यातील सरकारी आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांसाठी लागू असतील असं सांगण्यात आलं आहे.
मात्र या सुट्ट्यात महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नसून महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
किती ते किती तारखेपर्यंत सुट्टी?
20 सप्टेंबरपासून देण्यात आलेली सुट्टी 6 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 7 ऑक्टोबरला शाळा सुरु होतील असं कर्नाटक सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातील केवळ दक्षिण कन्नड प्रांतातील शाळा या दिलेल्या तारखेच्या आधीच सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित 3 ऑक्टोबरपासून दक्षिण कन्नड प्रांतातील शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र शाळा सुरु होण्याचा दिवस हा प्रत्येक शाळेप्रमाणे वेगळा असू शकतो. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या सुट्ट्यांबद्दल शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
…म्हणून काही शाळांना कमी सुट्टी
काही शाळा ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांसह किंवा डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्या देण्याच्या उद्देशाने आता दसऱ्याच्या कमी सुट्ट्या देणारा असल्याचे समजते. काही शाळा पुढील वर्षी बोर्ड परीक्षांसाठी एसएसएलसी विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी देण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेऊ शकतात.
या राज्यात 13 दिवस सुट्टी
दरम्यान, तेलंगणामध्ये, दसऱ्याच्या सुट्ट्या 21 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि 3 ऑक्टोबरपर्यंत असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी एकूण 13 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सुट्टीचे वेळापत्रक वेगवेगळं आहे.
इथं 12 दिवस सुट्टीचे
आंध्र प्रदेशात 24 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत शाळांना सुट्ट्या असतील. 3 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशमधील वर्ग पुन्हा सुरू होतील. कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुट्ट्यांबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र शाळांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांनाही सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
विशेष महत्त्व
या वर्षी दसरा 2 ऑक्टोबर रोजी येत आहे. साधारणपणे, या राज्यातील शाळांना अष्टमी ते विजयादशमी पर्यंत सुट्ट्या असतात. तथापि, अचूक तारखा मिळविण्यासाठी, कोणताही गोंधळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या डायऱ्यांमध्ये सविस्तर तपशील उपलब्ध असतो. दसरा हा केवळ एक सण नसून कुटुंबासोबत आनंदाचा काळ घालवण्याची संधी असते अशी दक्षिणेतील राज्यांमध्ये मान्यता आहे.
वर्षातील उरलेल्या सुट्ट्या कधी?
दसऱ्यानंतर येणाऱ्या इतर सुट्ट्यांमध्ये प्रामुख्याने 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीची सुट्टी असेल. याप्रमाणे गुरु नानक जयंतीची सुट्टी 5 नोव्हेंबर रोजी असणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि नाताळच्या सुट्ट्या 25 डिसेंबर रोजी असतील.