Apple iPhone 17 Series चे सर्वात महागडे मॉडेल iPhone 17 Pro Max कॉस्मिक ऑरेंज कलरच्या व्हेरिएंटला प्रचंड मागणी पाहायला मिळत आहे. कॉस्मिक ऑरेंज व्हेरिएंट भगव्या रंगाशी मिळते जुळते आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांमध्ये या व्हेरिएंटच्या रंगावरुन इतकी जास्त उत्सुकता आणि क्रेज पाहायला मिळत आहे की प्री बुकींग सुरु झाल्यानंतर तीन दिवसात हा व्हेरिएंट भारत आणि अमेरिकेत आऊट ऑफ स्टॉक झाला आहे.
स्टोअर पिक-अप ऑप्शनसह उपलब्ध नाही
Appel इंडियाच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भारतात आयफोन प्रो मॅक्सच्या सर्व व्हेरिएंट्स एप्पल स्टोर्सवर पिक-अप पर्यायासह प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध नाही. भारतात iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Pro सीरीज दोन्हीमध्ये कॉस्मिक ऑरेंज डिव्हाईस स्टोअर पिक-अप ऑप्शनसह प्री बुकींगसाठी उपलब्ध नाही
इकॉनॉमिक टाईम्सच्या मते एका Apple तज्ज्ञाने सांगितले की मला तुम्हाला हे सांगताना दुख होत आहे की , मोठ्या संख्येने प्री-ऑर्डरमुळे iPhone 17 Pro Max चे सर्व कॉस्मिक ऑरेंज खूप वेगाने विकले जात आहेत. आयफोन 17 प्रो मॅक्सच्या कोणत्याही स्टोरेजमध्ये सध्या हा कलर ऑप्शन उपलब्ध नाही.
तज्ज्ञाने सांगितले की मला असुविधेमुळे खरेच खेद वाटत आहे. परंतू बॅक – एण्ड टी लवकरात लवकर कॉस्मिक ऑरेंज (भगव्या रंगासारखा दिसणारा ) चा पुरवठा पुन्हा सुरु करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे. काही स्टोअर्सवर 19 सप्टेंबरपासून लिमिटेड युनिट्स उपलब्ध होतील, ज्यांना प्री बुकींग ऑर्डरसाठी खरेदी केले जाऊ शकते. परंतू हे हॅण्डसेट पहिले या पहिल मिळवा या आधारे दिले जाणार आहेत.
iPhone 17 Pro Max Price in India
आयफोन 17 प्रो मॅक्सचे 256 जीबी वेरिएंट, 512 जीबी,1 टीबी आणि 2 टीबी एकूण चार स्टोरेज व्हेरिएंट्स आहेत. आणि या व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 1,49,900 रुपये, 1, 69,900 रुपये, 1,89,900 रुपये आणि 2,29,900 रुपये आहे.
12 सप्टेंबरपासून आयफोन 17 सीरीजची प्री बुकींग चालू आहे. आणि 19 सप्टेंबरपासून प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांसाठी फोनची डिलिव्हरी सुरु होणार आहे.