Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रशेतकर्‍यांना दिलासा! आर्थिक मदत मिळणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

शेतकर्‍यांना दिलासा! आर्थिक मदत मिळणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे’ असं भरणे यांनी म्हटलं आहे.

 

मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. यावर बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, ‘ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.’

 

गेल्या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांना या पावसाचा फटका बसला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात 654 महसूल मंडळांमधील खरीप पिके धोक्यात आली आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्हे

नांदेड – 7,28,049 हेक्टर

वाशीम – 2,03,098 हेक्टर

यवतमाळ – 3,18,860 हेक्टर

धाराशिव – 1,57,610 हेक्टर

अकोला – 177,466 हेक्टर

सोलापूर – 47,266 हेक्टर

बुलढाणा – 89,782 हेक्टर

कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका?

गेल्या दोन महिन्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -