Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रप्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!; जाणून घ्या नवीन...

प्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!; जाणून घ्या नवीन दर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या तिकीट दरात सुमारे 15% वाढ जाहीर केली. ही दरवाढ लालपरी, शिवशाही, शिवनेरीसह सर्व प्रकारच्या बसेसना लागू असून, वाढते खर्च हे यामागील प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे.

 

महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सुमारे 15% वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 25 जानेवारी 2025 पासून जाहीर केली असली, तरी आता प्रत्यक्षात ती अंमलात आणली जात आहे.

 

साध्या एसटी बससाठी (लालपरी) – पहिल्या टप्प्यासाठी (6 किमी) तिकीट दर ₹10.05 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

 

शिवशाही AC बससाठी – प्रति 6 किमी टप्प्यासाठी दर आता ₹16 झाला आहे.

 

शिवनेरी बसचे दर देखील लक्षणीय वाढले असून, उदाहरणार्थ पुणे ते मुंबई प्रवास आता अधिक महाग झाला आहे.महामंडळाच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दरम्यान, डिझेलच्या किंमती, कर्मचारी पगार, महागाई भत्ता, तसेच बस देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी महामंडळाला मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत होता. हाकीम समितीच्या शिफारशींनुसार ही दरवाढ मंजूर करण्यात आली असून, यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

 

या दरवाढीमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ बसणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा अधिक फटका बसेल, कारण एसटी हेच त्यांच्यासाठी प्रमुख वाहतूक साधन आहे.राजकीय पक्षांनी या भाडेवाढीवर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत म्हटले आहे की, एकीकडे महिलांना ५०% प्रवास सवलत दिली जाते, आणि दुसरीकडे सामान्य प्रवाशांवर भाडेवाढीचा भार टाकला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -