टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत यूएई आणि पाकिस्ताननंतर शुक्रवारी 19 सप्टेंबरला ओमानला पराभूत करत सलग तिसरा विजय साकारला. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओमान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळताना 21 धावांनी विजय मिळवला. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.
भारताने ओमानसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नवख्या ओमानला हे विजयी आव्हान पूर्ण करता आलं नाही. मात्र ओमानने भारताला सहजासहजी जिंकून दिलं नाही. ओमानने भारताला विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडलं. ओमानच्या फलंदाजांनी विजयासाठी पूर्ण जोर लावला. मात्र भारतासमोर त्यांना विजयी होता आलं नाही. मात्र त्यानंतरही ओमानने आपल्या कामगिरीने मनं जिंकली. ओमानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. ओमानचा पराभव झाला. मात्र त्यांनी टी 20i क्रिकेटमधील संघाविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.