टीव्ही पाहण्यासाठी सध्या लोकांना दरमहा किमान ₹200 ते ₹300 रिचार्ज करावे लागते. मात्र, ओटीटी किंवा एचडी चॅनेल्ससाठी ही रक्कम ₹600 ते ₹1000 पर्यंत जाते.
आता BSNL ने ग्राहकांसाठी एक परवडणारा रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामुळे रिचार्जवर मोठी बचत करता येईल.
खास ऑफर
BSNL ने फक्त ₹61 मध्ये महिन्याला 1000 चॅनेल्स मिळवता येणारा खास प्लॅन सुरू केला आहे. हा प्लॅन IFTV (Integrated Fiber TV) किंवा भारत इंटरनेट टीव्हीवर आधारित आहे. ही डिजिटल टीव्ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांच्या 500+ लाइव्ह SD आणि HD चॅनेल्ससह येते. याव्यतिरिक्त, Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar सारखी लोकप्रिय ओटीटी सेवा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही वेब सिरीज आणि शो सहज पाहू शकता. BSNL ने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या ऑफरबाबत माहिती दिली आहे.
सेवा सुरू करण्याची पद्धत
ही सेवा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला WhatsApp वर 18004444 या नंबरवर संपर्क साधावा लागेल. नंतर “Hi” टाइप करून दिलेल्या मेनूमधून Activate IFTV निवडावे लागेल.
फायबर कनेक्शन आवश्यक
IFTV सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे BSNL भारत फायबर (FTTH) कनेक्शन असणे आवश्यक आहे. तसेच, स्थिर इंटरनेट गतीसाठी सक्रिय ब्रॉडबँड योजना असणे आवश्यक आहे. ही सेवा स्मार्ट टीव्ही, अँड्रॉइड टीव्ही किंवा Fire Stick डिव्हाइसवर वापरता येते. सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता नाही. ग्राहकांना फक्त त्यांच्या टीव्हीवर Skypro किंवा PlayboxTV अॅप इन्स्टॉल करून FTTH नंबरने लॉगिन करावे लागेल. ही सेवा फक्त BSNL नेटवर्कशी कनेक्ट झाल्यावरच चालू होईल.
आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार BSNL चं सिम
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारतीय पोस्ट विभाग यांच्यात समझोता करार (MoU) करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आता BSNL ची सिम कार्ड्स आणि रिचार्ज सुविधा देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसेसमध्ये उपलब्ध होणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेचा मुख्य उद्देश शहरी आणि ग्रामीण भागांमधील डिजिटल दरी कमी करणे आहे.
1.65 लाख पोस्ट ऑफिसेस होतील BSNL विक्री केंद्र
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे 1.65 लाख पोस्ट ऑफिसेस BSNL प्रीपेड सिम कार्ड आणि टॉप-अप सेवांसाठी विक्री केंद्र म्हणून काम करतील. BSNL कडून या डाकघरांना सिम स्टॉक आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच डाक विभाग BSNL साठी नवीन ग्राहकांना जोडणे, सुरक्षित व्यवहार पद्धती राखणे आणि व्यवहारांची सुलभता यासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल. येथे क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी.




