Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रसीमेवर तणाव वाढला; युद्धाचा भडका उडणार? नाटो देशांनी बोलावली आपत्कालीन बैठक

सीमेवर तणाव वाढला; युद्धाचा भडका उडणार? नाटो देशांनी बोलावली आपत्कालीन बैठक

रशिया आणि नाटो देशातील तणाव वाढतच आहे. दोन्हीकडून देखील माघार घेतली जात नसल्याचं चित्र आहे. त्यातच शुक्रवारी रशियाची तीन लढावू विमान नाटोचा सदस्य असलेल्या एस्टोनियाच्या हवाई क्षेत्रात घुसली होती. तब्बल बारा मिनिटं ही लढावू विमान हवेत घिरट्या घालत होती. यावर एस्टोनियाच्या सरकारनं जोरदार आक्षेप घेत ही अवैध पद्धतीनं केलेली घुसखोरी असल्याचं म्हटलं आहे. एस्टोनिया एवढ्यावरच थाबलं नाही तर त्यानंतर आता रशियाच्या या घुसखोरीला थांबवण्यासाठी एस्टोनियानं नाटोच्या इतर देशांकडे मदत मागितली आहे. नाटोच्या प्रवक्तानं याबाबत बोलताना सांगितलं की, रशियाचे लढाऊ विमानं एस्टोनियामध्ये घुसल्यानंतर आम्ही तातडीनं प्रत्युत्तरादाखल कारवाई केली, रशियाच्या विमानांना आम्ही प्रतिबंध घातला.

 

दरम्यान दुसरीकडे आता रशियानं घुसखोरी केल्यानंतर एस्टोनियानं नाटो देशांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. मंगळवारी सर्व नाटो देशांची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व नाटो देशांचे राजदूत उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये नाटो देशांच्या हवाई क्षेत्रात रशियाकडून होणाऱ्या घुसखोरीवर चर्चा होणार आहे. एस्टोनियानं नाटोच्या अर्टिकल चार अनुसार ही बैठक बोलावली आहे. नाटोच्या आर्टिकल चार नुसार नाटोचा सदस्य असलेला कोणताही देश, त्याला जर आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला होऊ शकतो किंवा धोका निर्माण झाला आहे, असं वाटल्यास तो आपत्कालीन बैठक बोलावू शकतो, तेच काम आता एस्टोनियानं केलं आहे, येत्या मंगळवारी ही बैठक पार पडणार आहे.

 

तणाव वाढला

 

दरम्यान रशियाकडून सुरू असलेल्या घुसखोरीमुळे रशिया आणि नाटो देशांमधील तणाव आता चांगलाच वाढला आहे, यापूर्वी रशियाकडून पोलंडच्या हवाई क्षेत्रामध्ये देखील घुसखोरी करण्यात आली होती, त्यानंतर रशियानं आता एस्टोनियाच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रशिया आणि नाटो देशांमधील तणाव चांगलाच वाढला आहे. नाटो देशांनी बोलावलेल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे यावर अद्याप रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. अमेरिकेकडून देखील रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -