Tuesday, November 25, 2025
Homeक्रीडामागच्या 13 वर्षात ज्या-ज्या वेळी असं झालय, तेव्हा…आशिया कपची फायनल या दोन...

मागच्या 13 वर्षात ज्या-ज्या वेळी असं झालय, तेव्हा…आशिया कपची फायनल या दोन टीममध्ये होऊ शकते

आशिया कप 2025 चा चॅम्पियन कोण होणार? याचा निर्णय 28 सप्टेंबरला होणार आहे. या किताबासाठी कुठल्या दोन टीम्समध्ये अंतिम सामना होईल, हे अजून निश्चित झालेलं नाही. ग्रुप स्टेज झाल्यानंतर आता सुपर-4 राऊंडनंतर फायनलचे दोन संघ ठरतील. या टुर्नामेंटमधील मजबूत आणि सुरुवातीपासून शानदार प्रदर्शन करणाऱ्या टीम इंडियाच फायनलमध्ये पोहोचण निश्चित मानलं जातय. टीम इंडियाचा सामना कोणाविरुद्ध होणार? हे पण लवकरच स्पष्ट होईल. सुपर-4 चे सर्व सामने पूर्ण होण्याआधीच अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित झालेत असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल. पण एका सामन्याचा असा निकाल लागलाय की, ही टीम बांग्लादेश असू शकते.

 

28 सप्टेंबरला दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये टुर्नामेंटचा फायनल सामना खेळला जाणार आहे. ग्रुप स्टेजमधूनच आशिया कपच मोठा दावेदार असलेला संघ अफगाणिस्तान बाहेर पडला. त्यांना बाहेर काढण्यात बांग्लादेशची महत्वाची भूमिका होती. बांग्लादेशने अफगाणिस्तानचा दारुण पराभव केला. याच कारणामुळे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेशिवाय बांग्लादेशच्या टीमने सुपर-4 राऊंडमध्ये प्रवेश केला. बांग्लादेश टीमने ग्रुप स्टेजनंतर आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केलीय. त्यांनी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या श्रीलंकन टीमला हरवलय.

 

या एका विजयामुळे बांग्लादेशची टीम फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढलीय. फक्त शक्यताच नाही, तर इतिहासावर नजर टाकली, तर असं लक्षात येईल की, बांग्लादेशच्या टीमच फायनलमध्ये पोहोचणं निश्चित आहे. मागच्या 13 वर्षात जेव्हा-जेव्हा आशिया कपमध्ये बांग्लादेशच्या टीमने श्रीलंकेला हरवलय त्या त्या वेळी या टीमने फायनलमध्ये प्रवेश केलाय. सर्वप्रथम 2012 साली बांग्लादेशने श्रीलंकेला हरवून फायनलमध्ये खेळले होते. इथे त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागलेला. मग, 2016 साली बांग्लादेशने पुन्हा श्रीलंकेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. पण यावेळी टीम इंडियाने त्यांना पराभूत केलं.

 

त्यांना रोखणार टीम इंडियाच

 

त्यानंतर दोन वर्षांनी 2018 साली बांग्ला टायगर्सनी पुन्हा श्रीलंकेला धूळ चारली. तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. पण टीम इंडियाने त्यांना किताब जिंकण्यापासून रोखलं. यावेळी सुद्धा टीम इंडियाच फायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित मानलं जातय. अशावेळी पुन्हा एकदा ट्रॉफीसाठी भारताचा सामना बांग्लादेश विरुद्ध झाला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण क्रिकेटमध्ये अनेकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -