Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? ९ जण ताब्यात, तपासात हादरवणारे...

धक्कादायक! एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? ९ जण ताब्यात, तपासात हादरवणारे सत्य समोर

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशाने कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

 

यामुळे आत प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले. या प्रवाशाने विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. मात्र पायलटने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे.

 

प्रवाशाने योग्य पासकोड वापरून विमानात प्रवेश केला. परंतु अपहरणाच्या भीतीने कॅप्टनने दरवाजा उघडला नाही. तो माणूस इतर आठ प्रवाशांसह प्रवास करत होता. सर्व नऊ प्रवाशांना सीआयएसएफच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर या प्रकरणी एअर इंडियाने वक्तव्य केले आहे. त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे विमानात मोठा गोंधळ उडाला होता.

 

एअर इंडियाने म्हटले आहे की, आम्हाला वाराणसीला जाणाऱ्या विमानाबद्दल मीडिया रिपोर्ट्समधून माहिती मिळाली. शौचालय शोधत असताना एक प्रवासी कॉकपिट अॅक्सेस क्षेत्रात घुसला. आम्ही जनतेला खात्री देऊ इच्छितो की विमानात कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही. लँडिंगच्या वेळी अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि सध्या चौकशी सुरू आहे.

 

प्रवाशाने कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान IX-1086 सकाळी 8 वाजता बेंगळुरूहून निघाले. विमान वाराणसीमध्ये उतरल्यानंतर, आरोपी प्रवाशांना CISF कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाने कॉकपिट केबिनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तो पासकोडने आत शिरताच , सिग्नल पायलटपर्यंत पोहोचला.

 

जेव्हा पायलटने सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा त्याला अपहरणाची भीती वाटली आणि त्याने दार उघडले नाही. यामुळे या प्रवाशाला कॉकपिट पासकोड कसा कळला असा प्रश्न निर्माण झाला. कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणारा प्रवाशाने पहिल्यांदाच विमानातून उड्डाण केले होते. त्याने असे का केले असे विचारले असता, त्याने सांगितले की त्याला शौचालय वापरायचे आहे. तो दरवाजा आहे असे त्याला वाटले. जेव्हा क्रूने त्याला सांगितले की, त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तो शांतपणे मागे हटला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -