Friday, October 31, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा...

टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

क्रिकेट विश्वात पंचांची भूमिका खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे अचूक निर्णय देणारे पंच असणं खूपच महत्त्वाचं होतं. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होण्यापूर्वीचा काळ पंचांसाठी खूपच महत्त्वाचा होता. अशा काळात डिकी बर्ड यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांची ख्याती सर्वोत्तम पंचामध्ये केली जात होती. डिकी बर्ड यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककला पसरली आहे.त्यांचं निधन झाल्याने क्रिकेटच्या इतिहासातील एक पान आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे. बर्ड यांचे 23 सप्टेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. यॉर्कशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या बर्ड यांच्या निधनाची घोषणा काउंटी क्लबने केली. यॉर्कशायरने माहिती देताना सांगितलं की, “क्रिकेटमधील सर्वात प्रिय व्यक्तींपैकी एक असलेल्या हॅरोल्ड डेनिस ‘डिकी’ बर्ड यांच्या निधनाची बातमी देताना यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबला खूप दुःख होत आहे.”

 

डिकी बर्ड यांनी एकूण 66 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले. अवघ्या 37 व्या वर्षी त्यांनी 1970 मध्ये त्यांचा पहिला काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्येही पंच म्हणून काम करू लागले. 1973 मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लीड्स कसोटीत पहिल्यांदा पंच म्हणून कामगिरी पार पाडली. 1996 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्यात शेवटची पंच म्हणून भूमिका बजावली. यावेळी दोन्ही संघांनी गार्ड ऑफ ऑनर दिला होता.

 

डिकी बर्ड हे अनेक सामन्यांचे साक्षीदार राहिले आहेत. त्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीचे तीन पर्व त्यांनी पाहिली आहे. 1975, 1979 आणि 1983 सालच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्यांनी पंचाची भूमिका बजावली आहे. या तिन्ही पर्वाच्या अंतिम फेरीत ते पंच होते. कपिल देव यांनी 1983 साली वनडे वर्ल्डकप जिंकला तेव्हा त्या विजयाचे डिकी बर्ड हे साक्षीदार होते. वेस्ट इंडिजला पराभूत करून टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.

 

डीकी बर्ड यांची क्रिकेट कारकिर्द काही खास राहिली नाही. यॉर्कशायरमधून त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. बर्डने यॉर्कशायरमध्ये तीन वर्षे घालवली आणि त्यानंतर लीसेस्टरशायरकडून खेळले. पण फार काही यश मिळालं नाही. त्यामुळे वयाच्या 32 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बर्डने 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये फक्त 3314 धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -