केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना १,८६६ कोटी रुपयांचा प्रोडक्टीव्हीटी लिंक्स बोनसला मंजूरी दिली आहे. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी १०.९० लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेय की हा बोनस त्यांच्या ७८ दिवसांच्या वेतना इतका असणार आहे. गेल्यावर्षी देखील मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांचा बोनस मंजूर केली होता,त्यामुळे ११,७२, २४० कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला होता.
किती मिळणार बोनस
एका पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसाच्या कमाल देय रक्कम १७,९५१ रुपये आहे. ही रक्कम विविध प्रकारच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल. यात रेल्वे ट्रॅक मेन्टेनर, लोकोमोटीव्ह पायलट, ट्रेन मॅनेजर ( गार्ड ), स्टेशन मास्तर,सुपरवायझर, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ हेल्पर, पॉईंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी आणि अन्य सी ग्रुप कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सणासुदीत हातात पैसा
शहरी आणि सेमी अर्बन दोन्ही बाजारात सर्वात मोठा ग्राहक समुहांपैकी एक, रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळाल्याने घरगुती खर्चात थेट वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ड्युरेबल गूड्स पासून ते कपडेलत्ते आणि सणासुदीच्या गरजेच्या वस्तू, दिवाळीच्या तोंडावर खर्च करण्यासाठी बाजारात पैसा मिळणार आहे. दिवाळीपूर्वी जास्त खर्च करण्यायोग्य उत्पन्नामुळे सामान्यतः किरकोळ विक्रीत वाढ होते.
95000 कोटीच्या प्रोजेक्टला मंजूरी
याशिवाय वैष्णव यांनी सांगितले की पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने ९४,०००-९५,००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी दिली आहे. ते म्हणाले की पंतप्रधानांनी काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आजच्या कॅबिनेटमध्ये विविध क्षेत्रातील सुमारे ९४,०००-९५,००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. आमच्या रेल्वेसाठी बख्तियारपुर-राजगीर-तिलैया रेल्वे मार्गाच्या दुपदीकरणा मंजूरी दिली आहे. आतापर्यंत ही मार्गिका एकेरी होती. त्यामुळे मर्यादा येत होती.दुहेरी मार्गिका होणार असल्याने वाहतूक क्षमतेत वाढ होणार आहे.




