Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रटाटा मोटर्सवर सायबर हल्ला; 2,38,61,66,00,000 रुपयांचे नुकसान, उत्पादन ठप्प, शेअर्स कोसळले

टाटा मोटर्सवर सायबर हल्ला; 2,38,61,66,00,000 रुपयांचे नुकसान, उत्पादन ठप्प, शेअर्स कोसळले

टाटा मोटर्सच्या ब्रिटनस्थित जग्वार लँड रोव्हर (JLR) या उपकंपनीवर सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे कंपनीला तब्बल 2 अब्ज पाउंड, म्हणजेच सुमारे ₹ 2,38,61,66,00,000 (2.38 लाख कोटी) एवढे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

या हल्ल्यामुळे JLR ला आपल्या अनेक कारखान्यांमधील उत्पादन थांबवावे लागले असून, कंपनीचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

 

या बातमीचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या शेअरवर दिसून आला. बुधवारी बीएसईवर कंपनीचा शेअर जवळपास 4% घसरून ₹655.30 वर आला. ही घसरण धोकादायक आहे कारण JLR हा टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात सुमारे 70% योगदान देणारा विभाग आहे. FY25 मध्ये JLR ने सुमारे 1.8 अब्ज पाउंड नफा कमावला होता, पण आता अपेक्षित नुकसान त्याहूनही जास्त होऊ शकते.

 

सायबर हल्ल्यानंतर JLR ला आपल्या अनेक प्लांट्समधील उत्पादन थांबवावे लागले. सुरुवातीला हे उत्पादन 24 सप्टेंबरपर्यंत थांबवण्यात आले होते, पण आता ही मुदत 1 ऑक्टोबरपर्यंत वाढवली गेली आहे. कंपनीने सुमारे 33,000 कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालांनुसार JLR ला दर आठवड्याला 50 मिलियन पाउंड (सुमारे 68 मिलियन डॉलर) इतके नुकसान होत आहे.

 

विम्याचा लाभही नाही

 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, JLR ने अशा प्रकारच्या घटनेसाठी कोणताही सायबर विमा घेतलेला नव्हता. लॉकटन नावाची विमा कंपनी यासाठी पॉलिसी तयार करत होती, पण ती वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता सर्व आर्थिक भार कंपनीलाच सोसावा लागणार आहे.

 

सायबर हल्ल्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. टाटा मोटर्सचा शेअर बीएसईवर बुधवारी 2.7% घसरून ₹682.75 वर बंद झाला, तर सकाळी 11.30 वाजेपर्यंत तो आणखी 2.87% घसरून ₹663.15 वर व्यापार करत होता.

 

या सायबर हल्ल्यामुळे केवळ कंपनीलाच नव्हे तर गुंतवणूकदारांनाही मोठा धक्का बसला आहे आणि उद्योगक्षेत्रात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -