येथील लिंबु चौक परिसरातील गजरे किक्रेते वसीम फारुक मुल्ला यांच्या घरी गुरुवारी रात्री शॉर्टसकर्कीटने लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्यासह सुमारे २ लाखाचे नुकसान झाले.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
बसीम मुल्ला यांची लिबु चौक परिसरात दोन घरे आहेत. त्यापैकी एका घरात दिवसभर मुल्ला कुटुंबिय बास्तव्य करते आणि रात्री
झोपण्यासाठी दुसऱ्या घरात जातात. दिवसभर वापरात असलेल्या घरातून गुरुवारी रात्री धूर येत असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी मुल्ला यांना दिली. तातडीने मुल्ला यांच्यासह नागरिकांनी घर उघडुन पाहिले असता आग लागल्याचे निदर्शनास आले. तातडीने महानगरपालिकेच्या अग्रिशमन दलास पाचारण करण्यात आले. पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. या घटनेत प्रापंचिक साहित्यासह सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे




