Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रना ओळख, ना वाद.... आईसमोर ५ वर्षांच्या चिमुकल्याचं शीर उडवलं, क्रूर आरोपीचं...

ना ओळख, ना वाद…. आईसमोर ५ वर्षांच्या चिमुकल्याचं शीर उडवलं, क्रूर आरोपीचं हादरवणारं कृत्य

पाच वर्षांच्या चिमुकल्याची त्याच्या आईच्या डोळ्यासमोरच हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. मनोरुग्णाने घरात घुसून चिमुकल्याचा शीर धडापासून वेगळं केलं. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

 

आईच्या डोळ्यादेखत तिच्या पोटच्या लेकराची निर्घृण हत्येची घटना हादरवणारी आहे. मध्य प्रदेशातील धार इथं ही घटना घडलीय. चिमुकल्याच्या कुटुंबासोबत कसला वाद नाही, ओळखही नसलेल्या आरोपीनं एक वार करताच शीर धडापासून वेगळं झालं होतं.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाच वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करणारा मनोरुग्ण होता. त्यानं मुलाच्या घरात घुसून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी ही घटना घडली असून प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी ते दृश्य खूपच भयंकर होतं असं सांगितलंय.शेजाऱ्यांनी सांगितलं की, २५ वर्षांचा आरोपी महेश दुचाकीवरून आला होता. तो कालु सिंहच्या घरात घुसला. कुणाला काहीच न सांगता घरातच पडलेलं टोकदार फावड्यासारखी वस्तू उचलली आणि चिमुकल्या विकासवर हल्ला केला.

 

मनोरुग्वाण महेशने केलेला वार इतका जोराचा होता की एकाच वाराने चिमुकल्याचं शीर धडापासून वेगळं झालं. एवढ्यावरच क्रूर मनोरुग्ण थांबला नाही. त्यानं मुलाच्या खांद्यावरही वार केले. त्याचं शरीर छिन्नविछिन्न केलं. लेकराची डोळ्यादेखत इतक्या क्रूर पद्धतीने झालेल्या हत्येनं आईला मोठा धक्का बसलाय. कुणाचा काहीच अपराध नसताना मनोरुग्णाने एका चिमुकल्याचा इतक्या निर्घृणपणे बळी घेतला. या घटनेनंतर आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

 

धक्कादायक म्हणजे आरोपी महेशची आणि चिमुकल्याच्या कुटुंबाची कसलीच ओळख नव्हती. महेश घरात घुसला तेव्हा त्याच्या आईने चिमुकल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती स्वत:ही जखमी झाली. पण लेकराला वाचवू शकली नाही. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे पळत आले. त्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

 

पोलिसांनी सांगितलं की, मनोरुग्ण आरोपीने चिमुकल्याची हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. यात जखमी झालेल्या आरोपीचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतर समोर येईल. आरोपी मनोरुग्ण होता अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. चिमुकल्याच्या हत्येआधी त्यानं एका दुकानात चोरीचा प्रयत्न केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -