Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रअंदमानच्या सागरात मिळाला मोठा खजिना, भारताचं नशीब पलटणार; खोल समुद्रात..

अंदमानच्या सागरात मिळाला मोठा खजिना, भारताचं नशीब पलटणार; खोल समुद्रात..

सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. तसेच एचवनबी व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतालाच बसत आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे आता भारत आत्मनिर्भर धोरणावर सर्वाधिक भर देत आहे. असे असतानाच आता भारताला एक मोठी खुशखबर मिळाली आहे. भारताला नैसर्गिक वायूचा खजिनाच सापडला आहे. या नव्या शोधामुळे उर्जाक्षेत्रात भारताचे बळ चांगलेच वाढणार आहे.

 

समुद्रापासून 17 किमी अंतरावर सापडले नैसर्गिक वायूचे साठे

मिळालेल्या माहितीनुसार अंदमान सागरात भारताला नैसर्गिक वायूचे भांडार सापडले आहे. हा शोध भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारत उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. या शोधाची पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनीच शुक्रवारी (27 सप्टेंबर) घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायूचा शोध एकूण 2 विहिरींमध्ये लागला आहे. या विहिरी अंदमान सागराच्या किनाऱ्यापासून साधारण 17 किमी दूर आहेत. 295 मीटर खोल सागरात नैसर्गिक वायूचा हा साठा सापडला आहे. या ठिकाणी नैसर्गिक वायूचा साठा शोधण्यासाठी समुद्रात 2650 मीटर खोदकाम करण्याचे ठरवण्यात आले होते. या खोदकामादरम्यान 295 मीटर अंतरावरच नैसर्गिक वायूचा साठा सापडला. हा साठा सापडल्यानंतर 2355 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले.

 

87 टक्के मिथेन वायू असल्याचे स्पष्ट

हरदीपसिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ज्या ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे सापडले तिथे अगोदर 2212 ते 2250 मीटपर्यंत इनिशियल प्रोडक्शन टेस्टिंग करण्यात आली. त्यानंतर इथे नैसर्गिक वायू असल्याचे आढळले. या ठिकाणी वेळोवेळी आग भडकल्याचेही दिसून आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणच्या नैसर्गिक वायूचे नमुने काकिनाडा येथे अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर चाचणीसाठी दिलेल्या गॅसमध्ये तब्बल 87 टक्के मिथेन वायू असल्याचे समोर आले,” असेही त्यांनी सांगितले.

 

आत्मनिर्भर भारतासाठी भारताला मोठे यश

दरम्यान, भारत परदेशातूनही नैसर्गिक वायूची आयात करतो. 2023-24 साली भारताला एकूण 44 टक्के नैसर्गिक वायूची आयात करावी लागली होती. मात्र आता या नव्या शोधामुळे भारताचा मोठा फायदा होणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मोहिमेत हे एक मोठे यश मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -