Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाEng vs Ind 4th test day 4 : भारताची आघाडी २५० पार,...

Eng vs Ind 4th test day 4 : भारताची आघाडी २५० पार, शार्दुल-रिषभ जोडीची संयमी खेळी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना कोरोनाचा धोका असूनही सुरू आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. मात्र, सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कसोटी सामना तूर्तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लंचनंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाली. शार्दुल ठाकूर-रिषभ पंत जोडीने संयमी खेळ करत. आघाडी वाढवत नेली. १२२ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर शार्दुलने १ धाव काढून भारताची आघाडी २५० पर्यंत पोहचवली.

दरम्यान, चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत टीम इंडियाने ६ विकेटवर ३२९ धावा केल्या आहेत. भारताची आघाडी २३० धावांची झाली आहे. शार्दुल ठाकूर ११ आणि रिषभ पंत १६ धावांवर नाबाद आहेत.

कर्णधार कोहलीचे अर्धशतक हुकले…
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ४४ धावा करून बाद झाला. मोईन अलीने त्याला माघारी धाडले. पहिल्या स्लिपमध्ये क्रेग ओव्हरटनने त्याचा झेल पकडला. मोईन अलीने सहाव्यांदा विराटची विकेट घेतली.

रहाणे बाद….
जडेजा बाद झाल्यानंतर मैदानात उपकर्णधार अजिंक्य रहाणे आला. कोहलीला त्याची साथ मिळेल अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. ख्रिस वोक्सने १०४ व्या षटकात भारताला पाचवा धक्का दिला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर रहाणे पुन्हा एकदा गोंधळलेला दिसला आणि आत येणाऱ्या चेंडूवर एलबीडब्यू बाद झाला. त्याला शुन्यावरच तंबूत परतावे लागले.

जडेजा बाद…
१०२ व्या षटकात भारताला चौथा धक्का मिळाला. ख्रिस वोक्सने रवींद्र जडेजाला षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद केले. जडेजाने डीआरएस घेतला पण तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय योग्य असल्याचे घोषीत केले.

कोहलीच्या प्रथम श्रेणीच्या १० हजार धावा पूर्ण…
विराट कोहलीने ९९ व्या षटकात रॉबिन्सनविरुद्ध तीन धावा काढून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. विराटचा हा १२८ वा प्रथम श्रेणी सामना आहे. कर्णधार कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर आपल्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या.

रोहितचे दमदार शतक
भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत शतक ( १२७ ) ठोकले. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने ६१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची दमदार भागीदारी रचली. अखेर ऑली रॉबिन्सनने रोहित आणि चेतेश्वर पुजाराला एकाच षटकात बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने भारताला २७० धावांपर्यंत पोहचवले.
अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी विराट २२ तर जडेजा ९ धावा करुन नाबाद राहिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -