पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली. दरम्यान नृसिंहवाडीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची पंचगंगा नदीत उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. रेस्क्यू फाेर्सचे जवान आणि पाेलिसांनी नदीत उड्या मारलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
राजू शेट्टी यांची नृसिंहवाडी सभा सुरु असताना पुलावरुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते दिनकर यादव यांनी पंचगंगा नदीत उडी मारली. रेस्क्यू फाेर्सचे जवान आणि पाेलिसांनी त्याला सुखरुप बाहेर काढले. यानंतर स्वाभिमानीच्या दाेन कार्यकर्त्यांची पंचगंगा नदीत उडी मारली. त्यांनाही रेस्क्यू फाेर्सने बाहेर काढले.
रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे पथक 10 यांत्रिक बोटी तैनात
कुरुंदवाड येथील कृष्णा घाट, दिनकराव यादव पूल व नदी परिसरात पोलिस आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे पथक 10 यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क आहे. पोलिस नदी परिसरात यांत्रिक बोटीद्वारे गस्त घालत आहेत.
राजू शेट्टी यांनी नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार, अशी घोषणा केल्याने पोलिस प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तर दिनकरराव यादव पुलाजवळ रेस्क्यू फोर्सची ५ पथके पोलिसांनी तैनात केली आहेत.