नवरा बायकोत भांडण करू नका; असे समजावून सांगणाऱ्या मामे सासऱ्यावरच भाचे जावयाने ब्लेडने वार करून जखमी केले आहे.केज, गेवराई, धारूर येथे आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर; शेळ्या-मेंढ्या सोडून रास्ता रोको
या बाबतची माहिती अशी की, केज येथील क्रांतीनगरमध्ये राहत असलेले संजय दगडू वडमारे हे दि.२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास कानडी चौक येथे असताना तेथे त्यांची भाची अंजली सोमनाथ वाघमारे हिने त्यांना तिचा नवरा भांडण करीत असल्याची आणि मारहाण करीत असल्याचे सांगितले. म्हणून संजय वडमारे यांनी अंजली आणि तीचा नवरा सोमनाथ वाघमारे यांना भांडण करु नका. असे समजावून सांगितले. त्या नंतर संजय वडमारे यांनी त्या दोघांना ॲटोरिक्षा मध्ये बसवून अंजली हिच्या आईचे घरी आयटीआय कॉलेज समोर असलेल्या रमाई नगर येथे संध्याकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घेऊन गेले.
तेथे जाताच सोमनाथ सुनिल वाघमारे याने रा. बजरंग नगर बीड याने “तु मला समजावुन सांगणारा कोण ? तु इथे का आलास ?” असे म्हणुन शिविगाळ केली आणि तेथे पडलेल्या ब्लेडने संजय वडमारे यांच्या डाव्या गालावर आणि उजव्या हाताच्या मनगटा जवळ ब्लेडने वार करून दुखापत केली.
संजय वडमारे यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून सोमनाथ सुनील वाघमारे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडाकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत.
