‘बिग बॉस 19’मधून आवेज दरबारने स्वत:हून माघार घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशीची बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं गेलं.इतकंच नाही तर त्याने ‘बिग बॉस’मधून बाहेर पडण्यासाठी दोन कोटी रुपये दंड भरल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांवर आता त्याने मौन सोडलं आहे. बिग बॉसला दंड भरला की नाही, याचाही खुलासा आवेजने केला आहे
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आवेज म्हणाला, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी असं काहीच केलेलं नाही. आम्ही कोणतीच भरपाई दिलेली नाही. शोमधून बाहेर पडण्यासाठी मी कोणालाच दोन कोटी रुपये दिले नाहीत. किंबहुना आम्ही काहीच पैसे दिले नाहीत
मला रिअॅलिटी शोज आवडतात. याआधी मी ‘झलक दिखला जा’मध्येही भाग घेतला होता. तेव्हा मी दुखापतीमुळे शो सोडला होता. असं मध्येच शो सोडताना मलाही खूप दु:ख होतं. बिग बॉसमध्ये येणं माझं स्वप्नच होतं, त्यामुळे मी त्यातून का माघार घेईन”, असा सवाल आवेजने केला
“बिग बॉसच्या घरात राहूनच मी दोन, चार, पाच, सहा कोटी रुपये कमाऊ शकतो. त्यामुळे शो मधेच सोडून माझंच नुकसान होणार आहे. मी असं का करेन? परंतु निर्मात्यांनी ज्याप्रकारे माझी वहिनी गौहर खानला बोलावून त्याच एपिसोडमध्ये मला बाहेर काढलं, ते पचवणं जरा कठीण आहे”, असं तो पुढे म्हणाला.



