Saturday, November 1, 2025
Homeमहाराष्ट्र11 वर्षीय मुलगा खेळता-खेळता लिफ्टमध्ये अडकला अन् क्षणात…

11 वर्षीय मुलगा खेळता-खेळता लिफ्टमध्ये अडकला अन् क्षणात…

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या चोवीसावाडी येथे अमेय फडतरे या अकरा वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आता पोलिकांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणात तांत्रिक तपास सुरू असून लिफ्ट मध्ये काही दोष असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

लिफ्टमध्ये अडकून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, अमेय हा लिफ्ट सोबत खेळत होता. तो जिन्याने वर जायचा आणि लिफ्टने खाली यायचा. काही वेळ हा खेळ सुरु होता. मात्र खेळत असताना लिफ्टच्या दरवाजाच्या मधल्या जागेत अमेय अडकला व तो गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत बराच काळ मदतीसाठी ओरडत होता, मात्र त्याला वेळेवर मदत मिळाली नाही. अमेय लिफ्टमध्ये अडकला आहे हे लवकर कुणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्याला मदत मिळण्यात उशीर झाला.

 

फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अमेय लिफ्टमध्ये अडकल्याचे लक्षात येताच ही माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमनच्या जवानांनी अमेयला बाहेर काढले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान अमेयचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बऱ्याच काळापासून अमेय लिफ्टमध्ये अडकला होता, त्याला वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

अशा घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

लिफ्टचे अपघात नेहमी होत असतात. अशा घटना टाळण्यासाठी लिफ्टचा मेंटेनन्स वेळोवेळी करावा. तसेच मेंटेनन्स वेळेत केला असला तरी लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये सोडू नये. तसेच लहान मुले लिफ्टमध्ये अडकल्यास काय खबरदारी घ्यावी, याची जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी सोसायटीसह पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -