नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून फटाफट अर्ज करा. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती सुरू आहे. डीआरडीओ हैदराबादने अप्रेंटिस पदांसाठी ही भरती जाहीर केली. भरती प्रक्रियेतून 195 उमेदवारांची निवड केली जाईल. सगळ्यात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही आपल्याला द्यावी लागणार नाही. थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड ही केली जाईल. चला तर मग जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.
ही भरती प्रक्रिया 27 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालीये. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख 28 ऑक्टोबर 2025 आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करायचा आहे. DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करा. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सर्व माहिती मिळेल.
तब्बल 195 पदांसाठी मेगाभरती, आजच करा अर्ज
तंत्रज्ञ अप्रेंटिस 20 पदे, पदवीधर अप्रेंटिस 40 पदे, आयटीआय ट्रेड 135 पदे, टेक्निशियन अप्रेंटिसपदासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर संबंधित विषयात डिप्लोमा अनिवार्य आहे. पदवीधर अप्रेंटिस पदासाठी अर्ज करत असाल तर बीई किंवा बीटेक पदवी आवश्यक आहे. आयटीआय ट्रेड अप्रेंटिससाठी अर्ज करत असाल तर संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासोबतच वयाची अटही लागू भरतीसाठी ठेवण्यात आलीये.
ना लेखी परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे थेट होणार निवड
18 ते 24 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड ही त्याच्या कौशल्याच्या आधारे केली जाईल. उमेदवाराची कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाहीये. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करावी लागेल. ना परीश्रा असणार ना कोणताही मुलाखत फक्त तुमच्या कौशल्याच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे.