गेल्या 6 महिन्यात ज्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे, त्यात नेटवेब टेक्नॉलॉजी इंडियाचा (Netweb Technologies India) शेअर पण आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 7 टक्क्यांची उसळी दिसली. हा स्टॉक 4336.70 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचला आहे. या आठवड्यात नेटवेब टेक्नॉलॉजीच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी वधारली. या शेअरमध्ये इतकी तेजी कशामुळे आली? काय आहे त्यामागील कारण?
एकीकडे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. शेअर बाजार उसळीसाठी संघर्ष करत आहे. तर दुसरीकडे स्मॉल कॅप स्टॉक चांगली कामगिरी बजावत आहेत. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंत 175 टक्क्यांनी वधारली आहे. 5 आठवड्यात हा स्टॉक 11 वेळा त्याच्या उच्चांकावर पोहचला आहे. हा पण एक प्रकारचा विक्रम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचं बळ मिळालं आहे. तर हा शेअर अजून सरस, मोठी कामगिरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
AI मुळे तेजी
गुंतवणूकदार या कंपनीवर विश्वास टाकत आहे. त्यामागे एआय आणि हाय परफॉर्मिंग कम्युटिंग स्पेसमधील कंपनीचा विस्तार हे कारण मुख्य आहे. एआय सेगमेंटमध्ये अजून व्यापार वाढवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूलात 29 टक्क्यांहून अधिकचे योगदान एआयचे आहे. तर दोन वर्षांपूर्वी हा टक्का अवघा 7 टक्के इतका होता. येत्या काही दिवसात हा टक्का थेट 40 टक्क्यांच्या घरात पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर
गेल्या आठवड्यात नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीच्या एआय जीपीयू एक्सिलरेटेड सिस्टिम्सला काम मिळाले होते. या वर्क ऑर्डरचे एकूण मूल्य 450 कोटी रुपये होते. यापूर्वी कंपनीला 1734 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. Nividia Blackwell कडून इतकी मोठी ऑर्डर मिळाली. जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीकडे 4142 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. पहिल्या तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 30.50 कोटी रुपये होता.



