Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रटोलचा नवीन नियम, FASTag नसलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा, आता भूर्दंड नाही बसणार

टोलचा नवीन नियम, FASTag नसलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा, आता भूर्दंड नाही बसणार

15 ऑगस्ट रोजी सरकारकडून वार्षिक फास्टॅग पासची (Annual FASTag Pass) सुरुवात करण्यात आली. 3,000 रुपयांच्या या फास्टॅगने टोल प्लाझावरील व्यवहाराची झंझट संपवली. तर आता टोल टॅक्सविषयी अजून एक नवीन नियम येत आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग नाही अशा वाहनधारकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. टोल टॅक्स पेमेंट करण्यासाठी त्यांना आता UPI Payment चा वापर करता येईल. फास्टॅग नसेल तर आतापर्यंत टोल नाक्यावर दुप्पट टोल वसूल केला जायचा. पण आता हा भूर्दंड सहन करावा लागणार नाही.

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा दिला. विना फास्टॅग वाहनांना टोल भरण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. टोल टॅक्स पेमेंट सहज आणि सोप करण्यात आलं आहे. फास्टॅग जर वाहनांच्या काचेवर नसेल तर वाहनधारकांना दुप्पट टोल द्यावा लागत होता. पण नवीन नियमानुसार, आता फास्टॅग नसेल तरीही टोल देता येईल. त्यासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार नाही. UPI च्या मदतीने टोल टॅक्स पेमेंट केले तर आता दुप्पट टोल भरावा लागणार नाही. विना फास्टॅगवाल्या युझर्सला युपीआय पेमेंटद्वारे हे पेमेंट करता येईल.

 

1.25 पट टोल भरावा लागेल

 

फास्टॅग नसेल तर रोखीत दुप्पट टोल भरावा लागत होता. पण नवीन नियमानुसार, आता फास्टॅग नसेल तर आणि युपीआय पेमेंटद्वारे टोल भरायचा असेल तर आता 1.25 पट टोल द्यावा लागेल. ही नवीन व्यवस्था 15 नोव्हेंबर रोजीपासून देशभरात लागू होईल. 15 नोव्हेंबरपासून टोलनाक्यावर युपीआय पेमेंटची व्यवस्था असेल. दुप्पट टोल भरावा लागणार नाही.

 

फास्टॅगमुळे टोलवरील लांब रांगा कमी

 

टोल नाक्यावरील गोंधळ आणि घोटाळे थांबवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग सेवा अनिवार्य केली आहे. फास्टॅगची अंमलबजावणी झाल्यापासून टोल नाक्यावरील गर्दी, गोंधळ कमी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी झाल्या. वर्ष 2022 पर्यंत फास्टॅगची व्याप्ती 98 टक्क्यांपर्यंत पोहचली होती. नियमानुसार, विना फास्टॅगवाल्या वाहनांना टोल नाक्यावर दुप्पट टोल भरावा लागत होता. आता युपीआय पेमेंटद्वारे टोल टॅक्स भरत असाल तर दुप्पट नाही तर सव्वा पट टोल भरावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -