Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रहृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली...

हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्…

मो भाऊ आपल्या छोट्या भावाला शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या लहान भावाला अधिकारी करण्याचं स्वप्न होतं. मोठा भाऊ देखील छोट्या भावासाठी कष्ट करत होता.

 

पण अचानक आजारपणामुळे छोट्याचा मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठ्या भावाला धक्का बसला. त्यानंतर त्यालाही हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.

 

कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कापरट्टी गावात ही दुःखद घटना घडली. सतीश बगन्नावर (१६) आणि त्याचा मोठा भाऊ बसवराज बगन्नावर (२४) या दोघांचाही मृत्यू झाला. पालकांनी आपली दोन मुलं गमावली आहेत. सतीशची प्रकृती काल अचानक बिघडली. त्याला खूप ताप आला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्याचा मृत्यू झाला.

 

सतीशच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचा मोठा भाऊ बसवराजला ही हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. दोन्ही भावांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गावात शोककळा पसरली आहे. सतीश बगन्नावर दहावीत शिकत होता. आपल्या भावाने मोठा अधिकारी व्हावं अशी बसवराजची इच्छा होती.

 

बसवराज स्वतः अशिक्षित होता, म्हणून त्याने त्याच्या छोट्या भावाला चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. बसवराज एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. बसवराज विवाहित होता, त्याला एक मुलगा आहे आणि त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे. ही दुःखद बातमी ऐकताच बसवराजची पत्नी पवित्रा देखील खाली कोसळली, आजारी पडली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही भावांच्या मृतदेहांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -