Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रकामाची बातमी! फक्त या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचे ₹१५००; तुमचं नाव आहे का?

कामाची बातमी! फक्त या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचे ₹१५००; तुमचं नाव आहे का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे.सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे तरीही सप्टेंबरचा हप्ता दिला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, फक्त काही महिलांनाच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे.

 

फक्त या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचा हप्ता (Only These Women Get Benefit Of Ladki Bahin Yojana)

 

सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा सरसकट सर्व महिलांना मिळणार नाहीये. ज्या महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेअंतर्गत १५०० रुपये दिले जाणार आहे. सध्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरु आहे. यातील अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत.

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. तुम्ही या कालावधीत केवायसी करा जेणेकरुन तुम्हाला पुढचे हप्ते मिळतील. त्यामुळे निकषांमध्ये बसणाऱ्या आणि केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

पती आणि वडिलांचीही केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana KYC Process)

 

लाडकी बहीण योजनेत आता पती आणि वडिलांचीही केवायसी करावी लागणार आहे. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न तपासण्यासाठी ही केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख असणे गरजेचे आहे. जर तुमचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. यासाठी लाडकी बहीण योजनेत केवायसी केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -