तिरुवनंतपुरम: केरळातील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातून सोन्याच्या चोरी झाल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या आघाडीने आज विधानसभेत या प्रकरणाचा मुद्दा उचलण्यासह देवसोम बोर्ड मंत्र्याचा राजीनामा करत लागोपाठ दुसऱ्या दिवशी केरळातील विधानसभेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले. प्रश्नोत्तराचा तास सुरु होताच विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत या प्रकरणात चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षाचे नेते व्ही.डी. सतीसन यांनी देवस्वओम मंत्री व्ही.एन.वासवन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
केरळ हायकोर्टाचा निर्णय
सबरीमाला मंदिराच्या द्वारपालकाच्या मूर्तींच्या स्वर्ण आवरण आणि तांब्याच्या आवरणात कथित विसंगती आढळल्याने केरळ हायकोर्टाने सोमवारी या प्रकरणात चौकशीचे आदेश देत अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कायदा आणि सुव्यवस्था ) एच. व्यंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. हा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालकच्या मार्गदर्शनाखाली त्रिशूरच्या केईपीएचे सहायक संचालक ( प्रशासन ), एस. शशिधरण (आयपीएस ) द्वारा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. हा तपास सहा आठवड्यात वेगाने करण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
का आहे वाद ?
सबरीमाला मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालकाच्या दगडाच्या मुर्तींवर तांब्याच्या पतऱ्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. यात अपहार केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांना या प्रकरणात चोरी आणि दुरुपयोगाचा आरोप केला आहे. त्रावणकोर देवसोम बोर्डाने दुरुस्तीसाठी हे पॅनल हटवले होते. त्यांना उन्नीकृष्णन पोट्टी नावाच्या एका प्रायोजकाला सोपवण्यात आले होते. सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्याच्या प्लेटना पहिल्यांदा 2019 मध्ये दुरुस्तीसाठी हटवले होते. त्यावेळी प्रायोजक उन्नीकृष्णन पोट्टी यांच्याकडे त्या सोपवल्या होत्या. 39 दिवसांनंतर 38.258 किलोग्राम वजनाच्या या प्लेट परत करण्यात आल्या. त्यावेळी 4.541 किलोग्राम वजन कमी आढळले. सप्टेंबर 2025 वारंवार झीज होत असल्याचे सांगत बोर्डाने पुन्हा पॅनल हटवले.सबरीमालाचे विशेष आयुक्तांनी 9 सप्टेंबर रोजी हायकोर्टाला सांगितले की 2025 मध्ये त्यांना न्यायिक परवानगी शिवाय हटवले गेले होते. तपासानंतर 28 सप्टेंबर रोजी पोट्टी यांच्या बहिणीच्या तिरुवनंतपुरम येथील घरातून दोन प्लेट जप्त करण्यात आल्या.






