Thursday, October 9, 2025
Homeक्रीडाद्रविडचा धाकटा मुलगा झाला कर्णधार, 'या' स्पर्धेत करणार नेतृत्व; विदर्भाला सोडून करुण...

द्रविडचा धाकटा मुलगा झाला कर्णधार, ‘या’ स्पर्धेत करणार नेतृत्व; विदर्भाला सोडून करुण नायरची पुन्हा घरवापसी

भारताचा दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविडचे नाव नेहमीच घेतले जाते. आता त्याची पुढची पिढी मैदान गाजवण्यास सज्ज होत आहे. त्याच्या मोठ्या मुलाने समीत द्रविडने आधीच १९ वर्षांखालील भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. तसेच त्याचा धाकटा मुलगा अन्वय देखील दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

अन्वयने यापूर्वी १६ वर्षांखालील कर्नाटक संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी २०२४-२५ मध्ये कर्नाटकसाठी सर्वाधिक धावाही केल्या होत्या. यासाठी कर्नाटक क्रिकेट संघटनेकडून त्याचा गौरवही झाला होता. आता त्याला त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले असून तो आता कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार म्हणून दिसणार आहे.

 

कर्नाटक क्रिकेट संघटनेने अन्वयकडे विनू मंकड ट्रॉफी या १९ वर्षांखालील वनडे स्पर्धेसाठी कर्नाटक संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. अन्वयकडे कर्नाटकमधील उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे तो आता कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे.

 

करुण नायरचे कर्नाटक संघात पुनरागमन

 

भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट २०२५-२६ हंगाम सुरू झाला आहे. १५ ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच संघांची या स्पर्धेसाठी तयारी सुरू झाली असून कर्नाटक संघाने त्यांचा संघ जाहीर केला आहे. कर्नाटकच्या संघात त्यांचा जुना गडी करुण नायरचे पुनरागमन झाले आहे.

 

करुण नायरने गेल्या हंगामात विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते. विदर्भासाठी त्याने दमदार खेळही केला होता. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात ८ वर्षांनी पुनरागमनाची संधी मिळाली होती. पण त्याला फार काही करता न आल्याने पुन्हा संधी गमवावी लागली.

 

आता तो कर्नाटकसाठी खेळताना पुन्हा भारतीय संघाचे दार ठोठावणार का हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाचे नेतृत्व मयंक अगरवालकडे कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय संघात कृतिक कृष्णा, शिखर शेट्टी, मोहसिन खान असे काही नवे चेहेरेही आहेत.

 

रणजी ट्रॉफीसाठी कर्नाटक संघ – मयंक अगरवाल (कर्णधार), करुण नायर, आर स्मरण, केएल श्रीजीथ (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाल, वैशाख विजयकुमार, विद्वथ कवेरप्पा, अभिलाष शेट्टी, एम व्यंकटेश, निकिन जोस, अभिनव मनोहर, कृतिक कृष्णा (यष्टीरक्षक), केव्ही अनीश, मोहसिन खान, शिखर शेट्टी.

 

विनू मंकड ट्रॉफीसाठी कर्नाटक संघ – अन्वय द्रविड (कर्णधार, यष्टीरक्षक), नितीश आर्य, आदर्श डी उर्स, एस मणिकांत (उपकर्णधार), प्रणित शेट्टी, वासव व्यंकटेश, अक्षत प्रभाकर, सी वैभव, कुलदीप सिंग पुरोहित, रथन बीआर, वैभव शर्मा, केए तेजस, अथर्व मालविया, सनी कान्ची, रेहान मोहम्मद (यष्टीरक्षक)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -