Tuesday, December 16, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: गुटख्याची तस्करी करणारी मोटार पकडली

इचलकरंजी: गुटख्याची तस्करी करणारी मोटार पकडली

अवैधरीत्या सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची मोटारीतून तस्करी करणार्‍या सचिनकुमार आण्णासाहेब बावचे (वय 48, रा. मुरदुंडे मळा) याला गावभाग पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सव्वातीन लाख रुपयांच्या चारचाकी वाहनासह 25 हजार 624 रुपयांचा गुटखा असा 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याची फिर्याद पो. कॉ. विजय माळवदे यांनी दिली आहे.

 

गावभाग पोलिसांनी 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नदीवेस नाका परिसरात मरगुबाई मंदिराजवळ चारचाकी वाहन (क्र. एमएच-02 डीजी-3330) पकडले. या वाहनाची तपासणी केली असता तंबाखूजन्य पदार्थ व विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. या कारवाईमध्ये सव्वातीन लाखांची गाडी आणि 25 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी बावचे याला ताब्यात घेऊन अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -