दीबा पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केलं. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, नंतर आमचं सरकार राहिलं नाही. पण या कार्याला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारचा फार मोठा हातभार लागला याचा मला आनंद आहे” असं संजय राऊत म्हणाले. “आम्ही या विमानतळाच्या लोकापर्ण सोहळ्याच स्वागत करतो. आता एक मागणी आहे, मुंबईचं मूळ विमानतळ जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जातं. त्या विमानतळाची ओळख पुसली जाऊ नये, कारण ते छत्रपतींच्या नावाने आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “मुंबईच्या विमानतळ परिसरात शिवसेनेने भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या. तिथे भूमिपुत्रांचा आवाज राहिला. नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावाने गरबा खेळला जाऊ नये. तिथेही भूमिपुत्रांना सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्या ही आमची मागणी आहे. तसं झालं नाही, तर संघर्ष होईल” असं संजय राऊत म्हणाले.
पीएमचा भार हलका करण्यासाठी पंतप्रधान येण्याआधी फडणवीस यांनी पॅकेज घोषित केलं. पंतप्रधानांना यापेक्षा मोठं पॅकेज घोषित करण्यात काही अडचण नव्हती. फडणवीसांनी 31 हजार कोटींच पॅकेज घोषित केलं, मला त्यांना इतकाच प्रश्न विचारायचा आहे की, सरकारवर 9 लाख कोटींच कर्ज आहे, मग 31 हजार कोटींची उभारणी कशी करणार?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “पंतप्रधानांनी घोषणा केली असती, तर ते सर्व पैसे केंद्राकडून आले असते. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही, कवडी नाही आणि तुम्ही 31 हजार कोटींची घोषणा केली अशी टीका संजय राऊत यांनी केली. कर्जमाफीवर काही बोलला नाहीत. बाकी घोषणा आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होणार? याची साशंकता आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“पंतप्रधानांपुढे आंदोलन होऊ नये यासाठी काल पॅकेज जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस यांचं पॅकेज धुळफेक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आल्यानंतर त्यांना कोणी काळे झेंडे दाखवू नयेत, त्यांचा ताफा कोणी अडवू नये यासाठी केलेली ही धुळफेक आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राचे आहात, भाजपचे नाहीत. आमचेच शब्द का वापरता? जरा नवीन शब्दकोश वापरा. त्यात अनेक शब्द सापडतील. तिजोरी रिकामी असल्याने अजित पवार यांना झोप लागत नाही” असं संजय राऊत म्हणाले.