Wednesday, October 8, 2025
Homeमहाराष्ट्रजेवत असतानाच सासऱ्याचा सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला; मृत समजून पोलीस ठाण्यात पोहोचला अन्...

जेवत असतानाच सासऱ्याचा सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला; मृत समजून पोलीस ठाण्यात पोहोचला अन्…

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सासऱ्याने सूनेची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठच्या शास्त्री नगर सेक्टर १३ मध्ये मंगळवारी दुपारी एक भयानक घटना घडली.

 

निवृत्त झालेल्या सैनिकाने त्याच्या सूनेवर कुऱ्हाडीने हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने सूनेची हत्या केल्याचे सांगितले. चारित्र्याच्या संशयावरुन सासऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे.

 

निवृत्त लष्करी जवान इक्बाल हसन यांनी मंगळवारी दुपारी त्यांची सून राहत उर्फ हिनावर (२६) प्राणघातक हल्ला केला. हसनने कुऱ्हाडीने सूनेच्या मानेवर आणि डोक्यावर अनेक वार केले. तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपी हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आत्मसमर्पण केले. “मी माझ्या सुनेला कुऱ्हाडीने कापून टाकले, मला अटक करा, असं हसनने म्हटलं. जखमी हिनाला गंभीर अवस्थेत आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री नगर सेक्टर १३ येथील रहिवासी इक्बाल हसन सुमारे १२ वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाला. त्याचा मोठा मुलगा मेहताब मलिक याचा विवाह पाच वर्षांपूर्वी राहत उर्फ हिनाशी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे, जो सुमारे दीड वर्षांचा आहे. मोठा मुलगा आणि सून स्टार सिटी कॉम्प्लेक्समध्ये कोचिंग सेंटर चालवतात. इक्बालचा धाकटा मुलगा आफताब वैद्यकीय क्षेत्रात आहे. मुलगी एका बँकेत मॅनेजर आहे. मंगळवारी दोन्ही मुले एका नातेवाईकाच्या घरी मयत झाल्याने तिथे गेली होती. तर इक्बाल, हिना, नैमा आणि निष्पाप कबीर घरी होते.

 

दुपारी नैमा आणि हिना टेरेसवर जेवत होत्या. तितक्यात इक्बाल तिथे आला आणि त्याने ब्लँकेटमध्ये लपवलेल्या कुऱ्हाडीने हिनावर हल्ला केला. हिनाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली. ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. हे पाहून नैमा मदतीसाठी ओरडत घराबाहेर पळून गेली. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले.

 

शेजारच्यांनी हिनाला रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती पाहून तिथल्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर ते दुसऱ्या रुग्णालयात गेले, तिथेही डॉक्टरांनीही उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तिथून तिच्या कुटुंबियांनी नंतर तिला आनंद रुग्णालयात दाखल केले.

 

सुनेवर प्राणघातक हल्ला केल्या नंतर, इक्बाल हसन बाईकवर घराबाहेर पडला आणि पोलिस ठाण्यात पोहोचला. रक्ताने माखलेले कपडे आणि हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन, इक्बाल हसनने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि आत्मसमर्पण केले. मी माझ्या सुनेला कापून टाकले, असं तो पोलिसांना सांगत होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरभर रक्त पसरले होते. पोलिसांनी जखमी हिनाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हल्ल्याचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला त्याची सून हिना हिनावर संशय होता आणि याच कारणास्तव त्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -