राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतिक्षा आता संपली आहे. त्यांना दिवाळीपूर्वीच सप्टेंबर महिन्याची रक्कम मिळणार आहे. सप्टेंबर 2025 च्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्यापासून रक्कम जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची घोषणा केली. या घोषणेमुळे महिलांना आनंद होणार आहे.
Social Media X वर काय केली पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडिया एक्सवर केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याने त्यांना आधार मिळणार आहे. 1500 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल.
E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंत्री तटकरे यांनी दिले.
अशी करा ई-केवायसी प्रक्रिया
लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल उघडा
लॉगिन केल्यावर ईकेवायसी पॉपअप होईल.त्यावर क्लिक करा
आधार क्रमांक (Aadhaar Number) टाका
कॅप्चा कोड (Captcha Code) टाका
आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा
आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावरील OTP टाका आणि Submit करा
नवीन नियमानुसार पती, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमुद करा
आता लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा
आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर (Declaration) क्लिक करा
आता संपूर्ण माहिती एकदा वाचा. सबमिट बटन क्लिक करा.
e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मॅसेज




