Saturday, November 1, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिसांच्या घरांबाबत मोठा निर्णय, राज्य सरकारकडून मोठं पाऊल काय?

पोलिसांच्या घरांबाबत मोठा निर्णय, राज्य सरकारकडून मोठं पाऊल काय?

मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. मालकी हक्काने घरं द्या म्हणाऱ्या पोलीस बांधवांना सरकारकडून सध्या घराची पूर्तता होणार नाही. आज (10 ऑक्टोबर 2025) गृहविभागाने एक GR काढला आहे, पण यात मालकी हक्काने घर देण्यात येतील असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे महत्वाकांशी ‘पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रोजेक्ट’ मध्ये पोलिसांच्या हक्काच्या घरांचं स्वप्नं भंगलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई मध्ये पोलीसांकरिता Police Housing Township Project मूर्त स्वरुपात आणणे आवश्यक आहे. या प्रकल्पास गती देण्याकरिता त्याचा नियोजनबध्द आराखडा तयार करणे आवश्यक आहे तसेच राज्य स्तरावरुन आवश्यक निधीची देखील तरतूद करणे गरजेचे असल्याचा शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पोलीसांनी नमूद केलेल्या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करुन मुंबई शहरामध्ये मुंबई पोलीसांकरिता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने उचित शिफारशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 

 

पोलीस हाऊसिंग प्रकल्पासाठी समिती गठीत

गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -