देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका येत्या 1 नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवून ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा फटका कोट्यवाधी ग्राहकांना बसणार आहे.
गेल्या दीड दशकात बँकिंग सेवांमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क लादल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. आता तर या दरांमध्ये अधिक वाढ होणार असून अगदी किती वाजता व्यवहार केले जाणार यावरुनही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. नेमके किती शुल्क कोणत्या सोयीसाठी आकरले जाणार आहे जाणून घेऊयात…
नव्या अटी आणि शुल्क
सरकारी व खासगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केले आहेत, जे येत्या काही दिवसांत लागू होतील. एसबीआयने क्रेडिट कार्डसाठी नवीन शुल्क अटी जाहीर केल्या आहेत. आता रिवॉर्ड पॉइंट्सने खरेदी केलेल्या उत्पादनांवर किंवा व्हाउचरवर 99 रुपये शुल्क भरावे लागेल.
एसबीआयचे नवे दर काय?
वीज, फोन, गॅस इत्यादींसाठी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर 1% शुल्क आकारले जाईल.
कॉलेज, शाळेची फी भरण्यासाठी थर्ड पार्टी अॅप किंवा वेबसाइटद्वारे केलेल्या पेमेंटवर 1% शुल्क आकारले जाईल. मात्र, हे शुल्क शाळा किंवा महाविद्यालयात थेट केलेल्या पेमेंटवर लागू होणार नाही.
डिजिटल वॉलेटमध्ये 1 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास १% शुल्क आकारलं जाणार आहे.
रात्री व्यवहार केल्यास वाढीव शुल्क
एचडीएफसी बँक रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कॅश रिसायकलर मशीन्समध्ये जमा केलेल्या रोख रकमेवर सर्व खात्यांसाठी प्रति व्यवहार 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारेल. हे दर 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. यामुळे कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर बोजा पडण्याची शक्यता जास्त आहे.
कोणत्या सेवेसाठी किती शुल्क?
डुप्लिकेट पासबुक 100 रुपये
एंट्रीसह डुप्लिकेट पासबुक 50 रुपये प्रति पेज
अतिरिक्त चेक पेमेंट थांबवणे 200 रुपये प्रति चेक
ग्राहकाच्या चुकीमुळे चेक परत येणे 150 रुपये
साईन व्हेरिफिकेशन 100 रुपये
संयुक्त बैंक खात्यात स्वाक्षरी पडताळणी 150 रुपये
डिमांड ड्राफ्ट (5 ते 10 हजार) 75 रुपये
पोस्टल शुल्क 50 ते 100 रुपये
रोख रक्कम काढणे (5 वेळा नंतर) 75 रु. प्रत्येकवेळी
खाते देखभाल शुल्क 500 रुपये
एसएमएस अलर्ट 10 ते 35 रुपये प्रति तिमाही
मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलणे 50 रु. जीएसटी
डेबिट कार्ड देखभाल शुल्क 250 ते 800 रुपये
डेबिट कार्ड री-पिन बदलणे 25 ते 50 रुपये




