Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रकमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली...

कमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली सुपारी, माजी महामंडलेश्वरचं भयानक कृत्य

एका शुटरला सुपारी देत तरुणाची हत्या घडवून आणली याप्रकणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा शकून पांडेय, असं या आरोपी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला माजी महामंडलेश्वर होती. धर्म, कर्म, उपासना याबाबत प्रवचने द्यायची. पण आता तिच्या अंगातील सैताननं एका तरुणाचा जीव घेतला.

 

या अधिक माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अभिषेक गुप्ता आहे. अभिषेक गुप्ता आरोपी महिला पूजा शकून पांडेय हिच्यापेक्षा लहान होता. दोघांच्या अभ्यासाच्या बहाण्याने भेटीगाठी सुरू झाल्या. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबध प्रस्थापित झाले. मग आरोपी महिला अभिषेकला घरी बोलून घ्यायची. घरात त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवायची.

 

मात्र काही काळानंतर अभिषेक त्या संबंधांना कंटाळला. त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली. तिचा नंबर बंद करून तिला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं. अभिषेक आपल्याला टाळत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर आरोपी महिला संतापली. तिने पती अशोक पांडेय याच्यासोबत मिळून अभिषेकचा काटा काढण्याचा कट रचला.

 

पूजा आणि तिचा नवरा अशोक पांडेय यांनी अभिषेक गुप्ताच्या हत्येची सुपारी एका शूटरला दिली. या हत्येनंतर पोलिसांनी अशोक पांडेय आणि एका शूटरला अटक केली. मात्र पूजा शकून पांडेय ही फरार झाली. तसेच हरिद्वार येथे साध्वीचा वेश घेऊन लपली होती. अखेर अलिगड पोलिसांना सातत्याने पाठलाग करून तिला शोधून काढले आणि तिला बेड्या ठोकल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -