Friday, October 17, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

इचलकरंजी: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पालकांना जीवे मारण्याची धमकी देऊन आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रसाद सुरेश वाकरुशे (रा.शहापूर) या युवकाच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात ‌’पोक्सो‌’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संशयिताविरोधात संताप व्यक्त होत आहे.

 

संशयित प्रसाद हा शहापूर येथील एका कारखान्यात फॅबिकेशनचे काम करतो. या कारखान्यासमोरून आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी येत-जात होती. संशयिताने तिच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. मार्च ते 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान पीडितेच्या घरी व कबनूर येथे तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असता तो मिळून आला नसल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -