Monday, November 24, 2025
Homeब्रेकिंगदिवाळीआधी रेशनबाबत सरकारचा मोठा निर्णय ! 'या' 19 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता गव्हाऐवजी...

दिवाळीआधी रेशनबाबत सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 19 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता गव्हाऐवजी मिळणार ज्वारी, 

दिवाळीच्या आधीच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेशनबाबत सरकारकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने राज्यातील 19 जिल्ह्यांमधील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून राज्यातील 19 रेशन कार्ड धारकांचे गव्हाचे प्रमाण कमी करण्यात आले असून त्यांना आता ज्वारी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या आधीच पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असल्याने सर्वसामान्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा आहे.

 

यावर्षी सर्वसामान्यांना दिवाळीच्या भाकरी खाऊनच काढावी लागणार का ? असे म्हणत सर्वसामान्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे. सरकारकडून मागील हंगामात ज्वारीची जास्त खरेदी करण्यात आली होती.

 

यामुळेच आता पुरवठा विभागाकडून दिवाळीच्या आधीच राज्यातील 19 जिल्ह्यांमधील शिधापत्रिकाधारकांना गहू कमी करून ज्वारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरे तर शासनाच्या माध्यमातून अंत्योदय योजनेतील रेशन कार्डधारकांना 35 किलो धान्य दिले जाते.

 

यामध्ये 20 किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू दिला जातो. तसेच जे प्राधान्य कुटुंबातील आहेत त्या रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जातो.

 

पण आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेल्या या नव्या निर्णयानंतर आता अंत्योदय कार्डधारकांना 20 किलो तांदूळ आणि साडेसात किलो ज्वारी तसेच साडेसात किलो गहू दिला जाणार आहे.

 

तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती एक किलो ज्वारी, एक किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळणार आहे. आता आपण शासनाचा हा नवा निर्णय नेमक्या कोणत्या 19 जिल्ह्यांसाठी लागू राहील याची माहिती पाहूयात.

 

या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना गव्हासोबतच मिळणार ज्वारी

 

हिंगोली

 

बुलढाणा

 

अकोला

 

जळगाव

 

नांदेड

 

परभणी

 

बीड

 

धाराशिव

 

अहिल्यानगर

 

लातूर

 

सोलापूर

 

पुणे

 

सातारा

 

सांगली

 

वर्धा

 

नागपूर

 

संभाजीनगर

 

नाशिक

 

नंदुरबार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -