Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रहॉर्ट अटॅकने तडफडून कामगाराचा गेला जीव, मोबाईलवर व्यस्त मालकाने ढुंकूनही बघितले नाही;...

हॉर्ट अटॅकने तडफडून कामगाराचा गेला जीव, मोबाईलवर व्यस्त मालकाने ढुंकूनही बघितले नाही; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात, एका दुकानात काम करत असताना एका कामगाराला हृदयविकाराचा झटका आला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. जर त्याला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

 

या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर कामगार वेदनेने तडफडत असल्याचे दिसून आले आहे, तर दुकान मालक त्याला मदत करण्याऐनवी आरामात बसून मोबाईल फोन बोलत असल्याचे दिसत आहे. मालकाच्या असंवेदनशीलतेवर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे.

 

माहितीनुसार आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर भागात ही हृदयद्रावक घटना घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये केवळ एका कामगार अचानक कार्डियाक अटॅकमुळे जागीच मृत्युमुखी पडल्याचे दिसत आहे, हा व्हिडिओ व्हायरल होताच कामाच्या ठिकाणी जबाबदारीबद्दलही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या ६ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, एक कामगार नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना तो अचानक खुर्चीवर बसला अन् नंतर तो उठलाच नाही. त्याचे सहकारी त्याला उठविण्याचा प्रयत्न करु लागले पण तो फोल ठरला.

 

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, काही क्षणातच त्याचे शरीर अस्वस्थ आणि जड वाटू लागले. त्याने वारंवार त्याचे हात आणि पाय लाथ आदळले. तो खुर्चीवर वेदनेने तडफडत राहिला आणि त्याची स्थिती आणि शारीरिक हालचाली स्पष्टपणे दर्शवितात की त्याला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. त्याची तडफड पाहून, इतर सहकारी कामगार त्याच्या मदतीला धावून येतात, त्याला पाणी देतात आणि त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतात.

 

पण जवळच खुर्चीवर आरामात बसलेला त्याचा मालक ही सगळी परिस्थिती पाहतो, पण तो त्याच्या जागेवरून उठत नाही, प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करत नाही, किंवा रुग्णवाहिका बोलावत नाही. तो मोबाईल फोनवर बोलण्यात व्यस्त राहतो. दरम्यान, वेदनेने तडफडणारा कामगार अवघ्या सहा मिनिटांतच मरण पावतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -