भारताने महिला वर्ल्ड कपमध्ये जोरदार सुरुवात केली होती. पण नंतर टीम इंडियाच्या विजयाला ब्रेक सुद्धा तितकाच जोरात लागला. भारताने पहिल्या दोन सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानला धुळ चारली. पण नंतरच्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. या बॅक टू बॅक पराभवानंतर आता प्रश्न निर्माण होतोय की, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार?
महिला वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये 8 टीम आहेत. टॉप फोरच्या टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. पहिल्या दोन स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची टीम आहे. दोन सामने हरुनही टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. पण पहिल्या चारमध्ये टिकून राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. पराभव टाळून त्यांना विजयाशी हातमिळवणी करावी लागेल.
चांगली बाब ही आहे की, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतरही पॉइंट्स टॅलीमध्ये भारताची पोजिशन बदलेली नाही. टीम इंडियात तिसऱ्या स्थानावर कायम आहे. 0.682 रनरेटची यात महत्वाची भूमिका आहे. टीम इंडियाला पुढे हा रनरेटच वाचवणार नाही, तर त्यांना जिंकावं लागेल. असं घडलं नाही, तर टीम इंडिया टॉप फोरमधून बाहेर जाईल.
पुढचे तीन सामने टीम इंडियासाठी करो या मरो
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता काय करावं लागेल?. त्यासाठी टीम इंडियाला 19 ऑक्टोंबरला इंग्लंड, त्यानंतर 23 ऑक्टोंबरला न्यूझीलंड आणि 25 ऑक्टोंबरला बांग्लादेश विरुद्ध होणारे सामने जिंकावे लागतील. भारताने हे तीन सामने जिंकले तर थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. कारण हे तीन सामने जिंकून टीम इंडियाचे 10 पॉइंट होतील. त्याशिवाय रनरेटही सुधारेल.
तर जर-तरची स्थिती निर्माण होईल
पुढच्या तीन सामन्यांपैकी टीम इंडियाने दोन सामने गमावेल, तर त्यांचा महिला वर्ल्ड कपमधील प्रवास संपू शकतो. तेच तीन पैकी दोन सामने जिंकले, तर सेमीफायनलची अपेक्षा कायम राहिलं. सोबतच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या परफॉर्मन्सवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. 8 पॉइंट झाले तर जर-तरची स्थिती निर्माण होईल.