ऐन दिवाळीच्या तोंडावर कोल्हापूरातील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयावर गोकुळच्या संस्था प्रतिनिधींनी आज मोर्चा काढला. त्यामुळे कार्यालय परिसरात पोलीस आणि दूध उत्पादक तसेच संस्था प्रतिनिधींमध्ये चांगलाच राडा झाला. दूध संस्थांची कपात केलेली 40% डीबेंचर रक्कम परत करावी या मागणीसाठी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रतिनिधींनी हा मोर्चा काढला होता. गोकुळ विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चातील आंदोलकांनी आधी गाई – म्हशींसह गोकुळ कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनावरांना विरोध केल्याने सुरुवातीलाच पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली.

याआधी दहा ते पंधरा टक्के पर्यंत कपात होणारी डीबेंचरची रक्कम यावेळी 40 टक्क्यांपर्यंत का वाढवली असा सवाल यावेळेस शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला. गेली महिनाभर हा मुद्दा तापत असताना गोकुळ दूध संघाचे नेते, अध्यक्ष आणि प्रशासन देखील याकडे गांभीर्यांना बघत नसल्याचा आरोप सुद्धा महाडिक यांनी केला आहे.
डीबेंचर म्हणजे नेमक काय?
ग्रामीण भागातील दूध संस्था वर्षभर गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करत असतात. केलेल्या दूध पुरवठ्याच्या बदल्यात दूध संघाकडून दरवर्षी प्रति लिटर ठराविक रक्कम दूध संस्थांना फरक म्हणून दिली जाते. ही रक्कम म्हणजे दूध संस्थांचा होणारा नफाच असतो. मात्र दूध संस्थांच्या नफ्याची ही रक्कम गोकुळ दूध संघाकडून पुन्हा कर्ज रोख्यांच्या रूपात घेतली जात होती. यातून गोकुळ दूध संघाकडून राबवल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांना पैसे उपलब्ध होत होते.दूध संस्थांच्या वापरलेल्या या डोक्याला गोकुळ संघाकडून दूध संस्थांना व्याज देखील दिले जात होते.
यावेळी आक्षेप का?
दरवर्षी गोकुळ दूध संघाकडून डीबेंचर म्हणून दहा ते बारा टक्के इतकी रक्कम कफात केली जात होती. यावर्षी 40 टक्के करण्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे दूध संस्थांच्या नफ्यातील निम्म्यापेक्षा जास्त रक्कम ही गोकुळ दूध संघाकडे गेली.त्यामुळे दूध संस्थांना दिवाळीच्या तोंडावर दूध उत्पादकाला बोनस किंवा फरक वाटप करताना रक्कम कमी पडणार आहे. दूध संघाने यावर्षी म्हशीच्या दुधाला दोन रुपये 45 पैसे तर गाईच्या दुधाला एक रुपये 45 पैसे इतका फरक दिला आहे.मात्र, डीबेन्चरची मोठ्या प्रमाणात कपात झाल्यामुळे रक्कम देताना दूध संस्थांना अडचणी येत आहेत.
गेल्या महिनाभरापासून डीबेंचरचा हा मुद्दा तापलेला असताना गोकुळ प्रशासनाकडून त्याची अपेक्षित दखल घेतली नाही. कारण गोकुळ दूध संघाकडून याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष असलेले नविद मुश्रीफ हे विदेश दौऱ्यावर आहेत तर गोकुळच्या नेत्यांनी देखील याबाबत दखल घेऊन प्रशासनाला विचारणा केलेली नाही. त्यामुळेच आजच्या आंदोलनात संस्था प्रतिनिधींच्या संतापाचा उद्रेक झाला.
या आंदोलनानंतर गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी दोनच दिवसात दूध उत्पादकांना गोड बातमी दिली जाणार असल्याचं सांगितले. कपात केलेली डीबेंचर रक्कम दूध संस्थांना परत देणे हे तांत्रिकदृष्ट्या आता जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आता दूध फरकाची रक्कम वाढवून देण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघाचा असल्याचे म्हटले जात आहे. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संचालिका शोमिका महाडिक यांनी देखील या तोडग्यावर समाधान व्यक्त केलं आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीची तयारी
गोकुळ दूध संघाची निवडणूक अवघ्या एक वर्षावर आली आहे, असे असताना गोकुळ विरोधात निघालेल्या या मोर्चामुळे एक प्रकारे महाडिक यांनी या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. गोकुळ दूध संघाची निवडणूक सर्वांना सोबत घेऊन म्हणजेच महायुती म्हणून लढणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणत असले तरी शौमिका महाडिक या गोकुळ दूध संघाच्या विरोधात अजूनही घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गोकुळ मधील संभाव्य युतीमध्ये देखील मिठाचा खडा पडला आहे.