Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाInd vs SA, 1st Test: पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक...

Ind vs SA, 1st Test: पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सेंच्युरियन’च्या (Centurion) मैदानावर टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) पहिला कसोची सामना (Test Match) रंगला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिके 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर सेन्चुरियन या दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या मैदानावर आतापर्यंत एकाही आशिया खंडातील क्रिकेट संघाला विजय मिळवता आला नव्हता. तो बहुमान टीम इंडियाने मिळवला आहे. या मालिकेतील पुढील सामना जोहान्सबर्गमध्ये 3 जानेवारी 2022 पासून खेळला जाणार आहे. या वेळीही विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

टीम इंडियाने या सामन्यात सर्वप्रथम फलंदाजी केली. पहिल्या डावात केएल राहुलचे (123) शतक आणि अग्रवालचे अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. लुंगी नगिडीला सर्वाधिक 6 विकेट मिळाल्या. टीम इंडियाला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेच्या संघ केवळ 197 धावांवर गार पडला. टेंबा बावुमा यालाच अर्थशतक ठोकण्याची संधी मिळाली. टीम इंडियाने 130 धावांची आघाडी घेत मैदानावर उतरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -