काही दिवसांपूर्वी राज्यात पाऊस झोडपताना दिसला. अनेक भागात मोठी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक वाहून गेले. विशेष: मराठवाड्यात या पावसाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. मॉन्सून राज्यातून गेल्याचे सांगितले जात असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे, कोकण, मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. दसरा जाऊन दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाहीये. 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. अरबी समुद्रातील लक्षव्दीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 उंचीवर वारे वाहत आहे. केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टी निर्माण झाला. यामुळे राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळतंय.
मराठवाड्यातील काही भागात, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली या भागात पाऊस झाला. काल सायंकाली ठाणे जिल्हात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही बघायला मिळाले. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट देखील सुरू होता. भारतीय हवामान विभागाने 72 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत.