क्लासेसमध्ये मैत्रिणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून तिनं आयुष्य संपवलं. तिनं गळफास घेतलं असल्याचं कळताच कुटुंबियांनी तिला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून मुलीला मृत घोषित केले. तिनं मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती.
शमिका नागेश गावडे (वय वर्ष १६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तरूणी घणसोलीती तळवली भागातील रहिवासी होती. ती इयत्ता दहावीत शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिचं मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं. किरकोळ भांडणावरून मैत्रिणीच्या आईनं शमिकाला घरी बोलावून घेतलं. मैत्रिणीच्या आईनं शमिकाला मारहाण केली.
हा अपमान शमिकाला सहन झाला नाही. तिनं घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांना शमिकाच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुलीला घेऊन रूग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी तपासून शमिकाला मृत घोषित केले. रात्री आठच्या सुमारास शमिकाची आई घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
आत्महत्या करण्यापूर्वी शमिकानं चिठ्ठी लिहिली होती. यात तिनं सगळी माहिती दिली. तसेच आयुष्य संपवत असल्याचं सांगत आई – वडिलांची माफी मागितली. या प्रकरणी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.