Sunday, October 26, 2025
Homeमहाराष्ट्र‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या स्टारने घेतला मोठा निर्णय, आता चक्क…

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या स्टारने घेतला मोठा निर्णय, आता चक्क…

गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीचा मोठा पडदा गाजवणारा, अगदी धूमाकूळ घालणारा, घराघरांत लोकप्रिय झालेला शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. गोकुळधाम सोसायटी आणि त्यातले सगळे सदस्य अगदी घराघरांत माहीत आहेत. अतिशय लोकप्रियदेखील आहेत. मात्र या शोमधील अनेक कलाकारांनी काही कारणांमुळे शोला रामराम केला, त्यांची उणीव प्रेक्षकांना आजही जाणवते. जेठालाल, दयाबेन, बबिता, भिडे, त्यांची पत्नी अशा अनेक कलाकारांना लोकांनी डोक्यावर घेतलं. त्याचप्रमाणे या मालिकेतील गाजलेला आणखी एक कलाकारा म्हणजे गुरुचरण सिंह, ते या मालिकेत सोढीच्या भूमिेकत होते, त्यातून ते घराघरांत पोहोचेस. त्यांनी शानदार अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवलं.

 

मात्र गेल्या काही काळापासून ते मालिकत दिसत नाहीत, काही दिवसांपूर्वी ते बेपत्त झाल्याने चर्चेत आले होते, अखेर ते सापडलेच. मात्र हे गुरुचरण सिंह आता पुन्हा चर्चेत आले आहे, त्याचं कारण म्हणजे त्यांनी ॲक्टिंग सोडली आहे. अभिनयाला रामरा करत त्यांनी चक्क बिझनेसच्या दुनियेत पदार्पण केलं आहे. दिल्लीत त्यांनी एक नवं रेस्टॉरंट सुरू केलं असून ते आता याच क्षेत्रात स्थिरावणार आहे. खुद्द गुरुचरण सिंह यांनीच याबद्दल माहिती दिली.

 

सुरू केला नवा बिझनेस

 

तारके मेहता मध्ये सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह आता मालिकेत तर दिसत नाहीत, त्यांनी अभिनयक्षेत्रालाही रामराम केला आहे. मात्र आता ते नव्या बिझनेसमध्ये गुंतले असून त्यांनी दिल्लीतील प्रेमनगरमध्ये त्यांचं ‘चाप’चं दुकान सुरू केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी नुकतीच ही गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांनी चाप विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे. @sodhi_gcs या इन्स्टाग्राम हँडलद्वारे ते त्यांचं नवं व्हेंचर प्रमोट करत आहेत. एवढंच नव्हे तर गुरचरण सिंग यांचे जवळचे मित्रही सोशल मीडियावर त्यांच्या रेस्टॉरंटची जाहिरात करत आहेत. रेस्टॉरंटशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

मात्र गुरूचरण सिंह यांचा हा नवा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. बऱ्याच काळापर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये काम केल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी ॲक्टिंगमधून ब्रेक घेतला. त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानंदेखील आली, बेरोजगारीमुळे दबाव आणि आर्थित तंगीमुळे ते बराच काळ त्रस्त होते. तर गेल्या वर्षी एप्रिल 2024 मध्ये ते अचानक गायब झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दिल्लीहून बेपत्ता झालेले गुरूचरण सिंह यांना पोलिसांनी अखेर हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये शोधून काढलं. मानसिक तणावाशी सामना करत होता आणि कर्ज झाल्यामुळेही मी त्रासात होतो असं त्यांनी नमूद केलं.

 

मात्र आता याच गुरुचरण सिंह यांनी नवी सुरूवात केली असून नव्या बिझनेसमध्ये लक्ष घालत जोरदार तयारी करत ते मेहनतीसाठी सज्ज आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -